लॉकडाऊनमुळे कुठलाही फायदा झाला नाही – राहुल गांधी

Rahul Gandhi

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन लागू केला. मात्र लॉकडाऊनचा कुठलाही फायदा झाला नसल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. ते गुरुवारी उद्योगपती राजीव बजाज यांच्यासोबत झालेल्या वेबसंवादात बोलत होते.

यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन कसा फोल ठरला, हे तुम्हाला कळेल. लॉकडाऊन उठवल्यानंतरही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेला भारत जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे आपण पुन्हा होतो तिथेच परत आलो आहोत. आता केंद्र सरकार सर्व काही राज्यांवर ढकलून आपले हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याचे आढळून आले होते. मात्र, भारतात तब्बल दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विरोधकांकडून केंद्राच्या कार्यपद्धतीवर सतत टीका केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER