लॉकडाऊन परिणाम : महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी स्वच्छ

Maharashtra River

मुंबई :- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन पुकारल्याने राज्यातील नद्यांच्या प्रवाहात प्रदूषण कमी झाल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक कचरा, सांडपाणी टाकले जाते; शिवाय नदीत अनेक धार्मिक स्थळांवरून निर्माल्य टाकले जाते. आता सामाजिक अंतर ठेवण्याचे आदेश आल्यानंतर व लॉकडाऊनमध्ये सर्वच कारखाने बंद असल्याने प्रदूषणाची पातळी खालावली आहे, अशी माहिती काही पर्यावरणतज्ज्ञांनी दिली आहे.

दरम्यान देशव्यापी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर गंगा नदीचे पाणी स्वच्छ होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये झळकत आहेत. अशातच आज गंगा नदीचे पाणी स्वच्छ होण्यामागील शास्त्रीय कारणांचा उलगडा करताना वाराणसी येथील आयआयटी महाविद्यालयातील केमिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक पी. के. मिश्रा यांनी लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आलेले औद्योगिक कारखाने गंगा नदीच्या पाण्याची पत सुधारण्यास मदत करत असल्याचे सांगितले.

मुंबई धारावीतील सर्व आस्थापने बंद, महापालिकेचा निर्णय

तत्पूर्वी, कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे देशात २२ मार्चपासून तीन आठवड्यांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे देशातील १३० कोटी नागरिक घरातच आहेत. गंगा नदी मोठ्या प्रमाणात स्वच्छ झाल्याचे बहुतांश देखरेख केंद्रांना आढळून आल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) माहितीवरून स्पष्ट झाले होते. यालाच प्राध्यापक पी. के. मिश्रा यांनी दुजोरा दिला असून गंगा नदीच्या पाण्यामध्ये ४० ते ५० टक्क्यांनी सुधारणा झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


Web Title : Lockdown Results – Rivers water in Maharashtra clean

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)