सर्वपक्षीय बैठकीत लॅाकडॅाऊनचे संकेत, विरोधकांचा विरोध नाही पण….

Maharashtra Today

राज्यातला कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याचा सल्ला पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना बैठकी दरम्यान दिला होता. त्यानूसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी बैठक बोलवली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा सुर लॉकडाऊन लावण्याचा दिसत होता. राज्यात सध्या विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. शनिवार आणि रविवार कडक निर्बंध पाळण्यात येणार आहेत. राज्यातली प्रमुख शहरातील रस्त्यांवर आज शुकशुकाट होता. तर काही शहरांमध्ये विरोधकांनी लॉकडाऊनच्या विरोधात लक्ष्यवेधी आंदोलनं केली. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘भीक मांगो’ आंदोलन करत माध्यमांचं लक्ष्य वेधलं.

अनर्थचक्र टाळायचं असेल तर कडक लॉकडाऊन गरजेच

कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचं राज्यात चित्र आहे. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी व्हर्च्यूअल सर्वपक्षिय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिलेत. “कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे.” असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता

कोरोना हाताबाहेर जात असताना यावर अळा घालण्यासाठी, राज्यात १५ ते २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू शकतो असे संकेत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्याचं बैठिकीत उपस्थीत असलेल्या नेत्यांकडून समजतं आहे. राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक बोलवली. त्या बैठकीत मुख्यमंत्री चर्चा करतील. आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी काय केले पाहीजे याचा आढावा घेतील. यामुळं राज्यात लॉकडाऊन लागणार हे चित्र स्पष्ट असल्याचं सांगण्यात येतंय.

उपमुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी कॅबिनेटमधल्या महत्वाच्या मंत्र्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत राज्यात लॉकडाऊन लावलं तर पुरेशी तयारी आहे का? याचा आढावा घेतला जाईल. मुबलक अन्नधान्य साठा, आरोग्य यंत्रणेची तयारी, मजुरांबाबतची व्यवस्था, अशा अनेक गोष्टींचा आढावा यात घेतला जाणार आहे.

लॉकडाऊनवर राजेश टोपे म्हणतात

आरोग्य विभागाच्या अंदाजानूसार कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ११ लाखापर्यंत पोहचू शकतो. असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणताहेत. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर चार- पाच दिवसांचा लॉकडाऊन करुन उपयोग होणार नाही, १५ ते २१ दिवसांचा लॉकडाऊन करणं गरजेचं असल्याचं त्याचं मत आहे.

रॅमडेसिव्हिर इंजेक्शनाच्या तुटवड्याबद्दल त्यांनी यावेळी सांगितलं. येत्या २० दिवसात दुप्पट रॅमडेसिव्हिर इंजेक्शन्स उपलब्ध होतील असं उत्पादकांनी सांगितल्याचं ते म्हणाले. सोबतच पूर्वीसारखा कडक लॉकडाऊन लावला तर सामान्यांसाठी त्रासदायक ठरू शकतो असं मत मांडलं.

भाजप म्हणतं लॉकडाऊला विरोध नाही पण…

महाराष्ट्रात लॉकडाऊन संदर्भात सर्व पक्षांचं एकमत झालं असल्याची माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. भाजपचा लॉकडाऊनला विरोध नाही, पण वेगवेगळया घटकांसाठी काय मदत करणार याचा आराखडा ठरवावा, अशी आमची मागणी असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

राज्यभर दिवसेंदिवस कोरोना रुग्नसंख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊनचे हत्यार उपसले आहे. मात्र, टाळेबंदी विरोधात राज्यभरात रोष व्यक्त होत आहे. आता राज्य शासनाने आणखी कडक निर्बंध घालण्याचे संकेत दिले आहेत.

“राजेशाही असती तर त्यांना हत्तीच्या पायी दिलं असतं”- खासदार उदयनराजे

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात हटके आंदोलन केलं. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते. या प्रतिकात्मक आंदोलनावेळी उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

उद्यापासून नो लॉकडाउन असे म्हणून ‘आज जर राजेशाही असती तर पैसे खाणाऱ्या सगळ्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडवल असतं.’ असंही यावेळी उदयनराजेंनी बोलून दाखवलं. यावेळी उदयनराजे भोसले यांनी विविध मुद्द्यांवर बेधडक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

यावेळी उदयनराजे म्हणाले की, मी दुकानदार किंवा व्यापाऱ्यांच्या बाजूने नाही बोलत, मी सर्वसामान्यांच्या बाजूने बोलत आहे. तुम्ही सगळं बंद तुम्ही केलं . उपासमारी तुम्ही आणली. तुमच्या बापाची इस्टेट आहे. लॉकडाउनमुळं तुम्ही त्यांना भीकेला लावणार का? असा संतप्त सवाल उदयनराजेंनी प्रशासनाला केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button