‘लॉकडाऊन करावाच लागेल, सहकार्य असू द्या’, मुख्यमंत्र्यांचा थेट राज ठाकरेंना फोन

CM Uddhav Thackeray - Raj Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढत असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi) लॉकडाऊनची (Lockdown) तयारी सुरू आहे. मात्र विरोधी पक्षांनी लॉकडाऊनचा विरोध करत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फोन केल्याची माहिती खुद्द मनसेकडून देण्यात आली आहे.

“राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं  सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी राज ठाकरे यांना फोनवरील संवादात केलं, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली आहे. राज्यात लॉकडाऊन लावण्याला भाजपसह मनसेनंही विरोध दर्शवला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. इतकंच नाही, लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास मनसेनं सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनी बैठकीआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही फोन केल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे.

त्यामुळे काही निर्बंध कडक करावे लागतील. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही सहकार्य करा, असं उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सांगितले. यानंतर आवश्यक त्या उपाययोजनांसाठी आम्ही सहकार्य करू. आम्हाला कोरोनाबाबत राजकारणापेक्षा जनतेचे हित कायम महत्त्वाचे आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपा सरकारच्या पाठीशी नक्कीच उभी राहील, असंदेखील फडणवीस यावेळी म्हणाले. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनचा निर्णय होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button