टाळेबंदीत पर्यावरण सुधारले

Lockdown had positive impact on environment.jpg

मुंबई : टाळेबंदीच्या काळात औषधी (बायोमेडिकल) वगळता पर्यावरणातील इतर कचरा कमी झाला आहे. यामुळे पर्यावरण सुधारले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली. हवेतले प्रदूषण कमी झाले आहे. सर्व स्तरावर ६० टक्के प्रदूषण कमी झाले आहे.

अनेक ठिकाणी उद्योग बंद असल्याने परिसर स्वच्छ झाला. औद्योगिक कचरा कमी झाल्यामुळे उद्योगांचा कचरा गोळा करण्याचा ताण ७५ टक्के कमी झाला. हवेतील प्रदूषण कमी झाल्याने बऱ्याच दिवसांनी आकाशी स्वच्छ निळे दिसते आहे.

मॉल्स, हॉटेल्स आणि दुकाने बंद असल्याने शहरी भागातही कचरा निर्माण होण्याचे प्रमाण कमी झाले. टाळेबंदीत सार्वजनिक स्थळे बंद होती. या ठिकाणी निर्माण होणार कचराही कमी झाला. याकाळात परराज्यातील लाखो लोक परत गेलेत यामुळेही कचरा निर्मिती कमी झाली.

टाळेबंदीत विशेष वर्गवारीतील फक्त ९ हजार उद्योग सुरू होते. उद्योग बंद असल्याने वाहनांचा वापर कमी झाला त्यामुळे इंधनाची विक्री कमी झाली आणि प्रदूषणही कमी झाले. ६ नदीच्या पाण्याचे प्रदूषण कमी झाले. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले.

असे असले तरी या काळात कोरोनाच्या साथीमुळे औषधीसंबंधी कचरा मात्रसुमारे ४५ टक्के वाढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER