परप्रांतीच्या जागी आता मराठी तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी; मनसे राबवणार अजेंडा

Raj thackeray

ठाणे : कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेले परप्रांतीय मजूर लाखोच्या संख्येने आपल्या गावी परतण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात परप्रांतीयांचा भरणा झाल्याने राज्यातील मराठी माणसाला रोजगार मिळत नाही. लॉकडाऊनमुळे परप्रांतीय गावी जात असल्यने लॉकडाऊनने मराठी माणसाला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. मराठी तरुणांकडून विविध कामांसाठी अर्ज मागविण्यास मनसेच्या कामगार सेनेकडून आवाहन करण्यात आले आहे.

परप्रांतीयांचे लोंढे रोखा असे मनसेच्या स्थापनेपासून मनसेचे प्रमुख राज ठाकरे सांगत होते. व्होटबँकच्या नावाखाली हे लोंढे थांबविण्याच्या मुद्द्यावर एकमत होत नव्हते. लॉकडाऊनने ती संधी महाराष्ट्राला उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा घेत मनसे त्यांच्या अजेंडावरील कळीचा मुद्दा राबविण्यास सुरुवात केली आहे. मनसे कामगर सेनेचे सरचिटणीस गजानन राणे, सचिव सचिन मोरे यांच्या संकल्पनेतून उपध्याक्षक निशांत गायकवाड, कौस्तुभ लिमये, अमोल पिसाळ, वल्लभ चितळे यांनी मराठी तरुणांनी विविध कामाकरीता अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.

ड्रायव्हर, पेंटर, कार मेकॅनिक, प्लंबर, सीसीटीव्ही कॅमेरा असेंबल्ड, सुरक्षा कर्मचारी, हाऊस किपिंग, कॉम्प्युटर सर्व्हिस, केअर टेकर, नर्सेस, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, ट्रान्सपोर्ट, वॉटर सप्लायर्स ही परप्रांतीयाची मक्तेदारी होती. ते राज्यात काम करीत होते. त्यामुळे मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी नव्हत्या. आता ते महाराष्ट्रातून गेल्यानं व्यवसाय छोटा असो की मोठा त्यात मराठी तरुण तरुणीच काम करणार, असा निर्धार मनसेच्या कामगार सेनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. इच्छुक मराठी तरुणांनी ही संधी न दवडता गुगल फॉर्ममध्ये त्यांची माहिती भरून द्यावी, असे आवाहन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला