दिल्लीत पुन्हा २४ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला; मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा

Arvind Kejriwal

नवी दिल्ली : देशात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. काहीसा कोरोनाचा कहर पूर्वीपेक्षा कमी आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये लॉकडाऊन आणखी १ आठवड्यासाठी वाढवण्यात आला आहे. २४ मे रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. मात्र, निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केली आहे.

दिल्लीत गेल्या काही दिवसांत रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका आठवड्यात ६५ हजार १८० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, ४ मेपासून ३००हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. एका दिवसात सर्वाधिक मृत्यू ३ मेरोजी झाले होते. त्यावेळी शहरात ४४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. “कोरोनाचा कहर आधीपेक्षा कमी झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये जवळपास ६ हजार ५०० नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.” अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेनंतर एकूण २१ हजार २४४ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूच्या दैनंदिन संख्येत होणाऱ्या वाढीमुळे प्रशासनाने तीन नगरांमधील स्मशान आणि दफनभूमींची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button