‘कोरोना लस घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनबाबत संकेत

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज (11 मार्च) कोरोनाची लस (Covid 19 Vaccine) घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात त्यांनी कोरोनाचा लसीचा पहिला डोस घेतला. देशभरात गेल्या 1 मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना येत्या एक दोन दिवसात लॉक डाऊनबाबत निर्णय घेण्याचे संकेत दिलेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मी कोरोना लस घेणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दाखल झाले. त्यानंतर त्यांची प्राथमिक तपासणी केली गेली. यानंतर त्यांना लस देण्यात आली. कोरोनाचा धोका वाढतो आहे, पात्र असल्याने सर्वांनी मनात शंका न ठेवता नागरिकांनी लस टोचून घ्यावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, लसीकरण वेगाने वाढत आहे, तरी काही दिवसात काही ठिकाणी कडक लॉकडाऊन करावे लागेल, त्यामुळे काळजी घ्या, लॉकडाऊनबाबत येत्या एक दोन दिवसात निर्णय घेऊ, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER