‘लॉकडाऊनचा निर्णय योग्यच’, ठाकरे सरकारच्या निर्णयाला अमृता फडणवीसांचा पाठिंबा

Amruta Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई : वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता ठाकरे सरकारने महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून कडक निर्बंध घातले होते. मात्र त्याचा हवा तसा लाभ मिळत नसल्याने आज रात्री ८ वाजेपासून कडक लॉकडाऊनला (Lockdown) सुरूवात झाली आहे. या लॉकडाऊनबाबत राजकीय नेत्यांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया आहेत. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) ठाकरे सरकारच्या (Thackeray Goverment) या निर्णयाचे समर्थन केले आहे. सोबतच हातावर पॉट भरणाऱ्या लोकांसाठी काही ठोस योजना राबवण्याची मागणीही त्यांनी केली.

अमृता फडणवीस मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊनचं समर्थन करताना ठाकरे सरकारला काही सल्लेही दिलेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला, तो योग्यच असून सर्वांना मान्य करावाच लागेल. पण राज्यात हातावर पॉट भरणारे लोक आहे. त्यांची उपासमार होणार नाही याकडे लक्ष घालावे. राज्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडचा अभाव आहे. त्यामुळे त्या सुविधांमध्ये वाढ करून त्या सुधारल्या पाहिजेत, असंही अमृता फडणवीस म्हणाल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button