लॉकडाऊनचा निर्णय १४ एप्रिलनंतर; राजेश टोपे यांची माहिती

Rajesh Tope

मुंबई : राज्यात लॉकडाऊनची (Lockdown) परिस्थिती निर्माण झाली आहे, असे टास्कफोर्सच्या सदस्यांचे मत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यात आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना (Corona) परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली.

या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होत आहे. तर लॉकडाऊनच्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, लोकांचे जे काही प्रश्न असतील ते कसे सोडवायचे, लॉकडाऊन लावायचा झाल्यास किती दिवसांचा लावायचा, या मुद्द्यांवर चर्चा झाली. या सगळ्यावर केवळ चर्चाच झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री अर्थ आणि अन्य विभागांशी चर्चा करतील. त्यानंतर कॅबिनेट बोलावली जाईल आणि १४ एप्रिलनंतर यासंदर्भातला उचित निर्णय घेतला जाईल.”

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय अपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button