लॉकडाऊनमुळं परतलेल्या कामगारांसाठी नोकरी सोडून केल रोजगार निर्माण!

Lockdown creates jobs for returnees - Maharastra Today
Lockdown creates jobs for returnees - Maharastra Today

पश्चिम बिहारच्या चंपारण इलाक्यातील रामनगर तालुक्यातल्या मुडेरा गावात राहणारा २८ वर्षीय नितिल भारद्वाज. पंचकृषीत चर्चेचा विषय बनलाय. त्यांन मोती उत्पादन आणि मत्सपालन सुरु केलंय. ‘भारद्वाज पर्ल फार्म अँड ट्रेनिंग सेंटर’च्या माध्यमातून त्यानं स्वतःच्या नावाचं प्रशिक्षण केंद्रदेखील सुरु केलंय.

नितील यांनी २०१९मध्ये मोती पालन (पर्ल फार्म) आणि मत्सपालन करत आहेत. सर्वात विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या लॉकडाऊमध्ये गावी परतलेल्या बेरोजगार कामगारांना प्रशिक्षण देत, त्यांच्या पोटापाण्याच्या व्यवस्थी यांनी केलीये. नितील शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांच्याकडे ही पारंपारिक पद्धतीनं शेती व्हायची. त्यांनी कधीच शेतीतून उपजिवीकेच साधन निर्माण करायचा विचार केला नव्हता. पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कॉम्प्यूटर कोर्स केला. त्यांना एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. २०१७ मध्ये त्यांच्या वडीलांनी पहिल्यांदा मोतीपालनाबद्दल पेपरमध्ये बातमी वाचली होती. त्यावेळी नितील सुट्टी घेऊन गावी आले होते. नितीलच्या वडीलांनी जेव्हा मोतीपालनाबद्दल चर्चा केली, तेव्हा नितील यांनी प्रयोग करुन बघायला हवा असं सांगितलं.

नितील यांनी मोतीपालनासंबंधी सर्व माहिती गोळा केली. मध्यप्रदेशच्या ‘बमोरिया पर्ल फार्म’मधून त्यांनी प्रशिक्षण पुर्ण केलं. तिकडंच त्यांनी काम करायला ही सुरुवात केली. प्रशिक्षणसोबतच प्रत्यक्ष कामाचा अनूभव त्यांनी घेतला. मोती पालनासंबंधी सर्वच ज्ञान आपल्याला मिळालंय ही खात्री झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या अनूदानाचा उपयोग करुन त्यांनी तलाव बनवून घेतलं. . नोव्हेंबर २०१९मध्ये त्यांनी पहिल्यांदा मोती पालनाला सुरुवात केली.

मत्सपालनाची दिली जोड

एका एकराच्या शेत तळ्यात २० ते २५ हजार शिंपले टाकता येतात; पण सुरुवातीच्यता काळात त्यांनी फक्त ४००च शिंपले टाकले होते. आणि नियमितपणे त्यांचा सांभाळ सुरु केला. पहिल्यांदा त्यांनी फक्त २५ हजार रुपये कमावले. सुरुवातील शिंपले कमी असल्यामुळं नुकसान होण्याच्या शक्यता कमी झाल्या होत्या. रोज ते तलावात जाऊन शिंपले जिवंत आहेत का याची खात्री करायचे. असं त्यांनी सलग १५ दिवस केलं. मेलेल्या शिंपेल्यांना बाहेर काढणं प्राधान्यक्रमाचं काम असतं.

एका शिंपल्यावर ३० – ४० रुपये खर्च होतात. एका शिंपल्यात दोन मोती असतात. एका मोत्याचे कमीन १२० रुपये मिळतात. मोत्याची गुणवत्ता अधिक चांगली असेल तर २०० रुपये ही मिळतात. एका शिंपल्यातून २४० रुपये कमावणं शक्य आहे. पहिल्यांदा त्यांनी ७५ हजार कमावले. मोती पालनाबद्दल त्यांना पुर्ण आत्मविश्वास आल्यानंतर त्यांनी २५ हजार शिंपे तलावात सोडले.

नितील यांनी मोती पालनासोबतच तलावात मत्स्य पालन सुरु केलं. ते दोन प्रकारच्या शाकारहारी माशांना पाळतात. मत्स्य पालन करताना मांसाहारी मासा नसावा या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं असतं. मत्स्य पालनाच्या प्रत्येक सिझनमध्ये निलील अडीच लाख रुपयांचे उत्पन्न घेतात.

लॉकडाऊमध्ये घरी परतलेल्या मजूरांना दिला रोजगार

गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळं अनेक बिहारी कामगारांना मुंबई, दिल्लीहून गावी परतायला लागलं होतं. सर्वच काम करणारे लोक परत आल्यामुळं त्यांना गावात रोजगार भेटत नव्हता. मोठं आर्थिक संकंट या कामगारांसमोर उभं राहिलं होतं. नितील यांनी यातून वाट काढली. यानंतर सहा लोकांना त्यांनी मोफत मत्स्य आणि मोती पालनाचं शिक्षण दिलं.

मोफत प्रशिक्षणसोबत नितील कामगारांना पाच ते सहा हजार प्रति माह देताहेत. नितील यांच्याकडून प्रशिक्षण घ्यायला अनेकदा बाहेरील जिल्हयातील लोक येतात. त्यांच्याकडून अत्यल्प शुल्क आकारुन त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. मोतीपालन करुन वर्षाकाठी ३० लाख रुपये कमावणं सहज शक्य असल्याचं सांगितलं जातं. कमी कष्टात जास्तीचा नफा कमावण्यासाठी मत्स्य शेती आणि मोतीपालन उपयुक्त आहे. पारंपारिक शेतीतून शेतकऱ्यांनी इकडं वळावं असं आवाहनही नितील मुलाखतींमधून करत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button