दिल्लीत आणखी एक आठवडा लॉकडाऊन कायम; मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा

Arvind Kejriwal

नवी दिल्ली : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यातच आता आणखी एक आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याबाबतची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केली आहे.

कोरोना रुग्णांत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्लीत रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने १९ एप्रिलला एक आठवड्यासाठी लॉकडाऊन लागू केला होता. सरकारने लॉकडाऊन आणखी एका आठवड्यांसाठी वाढवला आहे. येत्या ३ मे पर्यंत दिल्लीत लॉकडाऊन कायम असणार आहे.

केजरीवाल काय म्हणाले?

या पार्श्वभूमीवर दिल्लीत सोमवारी ३ मे सकाळी ५ पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार आहे. दरम्यान कोरोना रुग्णवाढीचा वेग ३६-३७ टक्के इतका झाला आहे. यापूर्वी कोरोना रुग्णवाढीचा वेग इतका नव्हता. गेल्या १-२ दिवसापूर्वी हा वेग थोडा कमी होता. आजही कोरोना रुग्णवाढीचा वेग ३० टक्के आहे, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.

“दिल्लीला ७०० टन ऑक्सिजनची गरज आहे. आम्हाला केंद्र सरकारकडून ४८० टन ऑक्सिजन देण्यात आले आहे. उद्या केंद्र १० टन ऑक्सिजन पाठवणार आहे. त्यानंतर केंद्राकडून दिल्लीला ४९० टन ऑक्सिजन मिळाले आहे. मात्र, यातील केवळ ३३०-३३५ टन ऑक्सिजन दिल्लीत पोहोचला आहे. केंद्राकडून भरपूर पाठिंबा मिळत आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार एकत्र काम करत आहेत.” असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button