१ जूननंतरही लॉकडाऊन कायम? आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान

मुंबई :- कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लॉकडाऊन (Corona Lockdown) लावण्यात आला आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक शहरांत नव्या कोरोनाबाधितांची संख्या काहीशी घटताना दिसत आहे. एकीकडे राज्य महामारीला सामोरे जात असताना दुसरीकडे तौक्ते चक्रीवादळाचा आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे.

मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रत्येकाने चाचणी करावी यासाठीही पुढाकार घेत आहोत. रुग्णसंख्या किती आहे यावरच लॉकडाऊन उठवला जावा की वाढवला जावा, हे अवलंबून असेल. आमची आरोग्य आणि सुरक्षा प्राथमिकता आहे. लॉकडाऊन असला तरी राज्यात महत्त्वाची कार्यालये, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरू आहे. अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडायला मिळेल असे विचारत असाल तर ते पूर्णपणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

लसीकरण मोहिमेवर भाष्य
“आम्ही राज्यासाठी जास्तीत जास्त लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. जर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखायचे असेल तर लसीकरणाचा वेग वाढवून नागरिकांना सुरक्षित करावे लागेल. आम्ही आतापर्यंत दोन कोटी लोकांचे लसीकरण केले आहे. ग्रामीण भागात जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी लसीकरण करण्याचे आव्हान सध्या आमच्यासमोर आहे. यासाठी टास्क फोर्स मार्गदर्शन करत आहे. याचा फटका कुठे बसण्याची शक्यता आहे याकडे लक्ष देणे सुरू आहे. तसेच, कोरोना नियमांचे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय उद्योग सुरू ठेवणे आवश्यक असून त्याचे नियोजनही महत्त्वाचा भाग आहे.” असे भाष्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : चक्रीवादळावर आदित्य ठाकरेंचे बारीक लक्ष; थेट वॉर रूममध्ये जाऊन घेतला आढावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button