पुन्हा लॉकडाऊन म्हणजे शुद्ध वेडेपणा : संदीप जोशी

Sandip Joshi On Nagpur Lockdown

नागपूर : नागपुरात (Nagpur) कोरोनाचे (Corona) रुग्ण वेगाने वाढत आहेत. ते नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावायला हवे होते, पण पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी लॉकडाऊन घोषित केला. हा निर्णय म्हणजे शुध्द वेडेपणा आहे, अशी प्रतिक्रिया माजी महापौर संदीप जोशी (Sandip Joshi) यांनी दिली.

संदीप जोशी म्हणाले की, “गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि नियम पाळणाऱ्यांसाठी हा पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत क्लेशदायक आहे. कडक कायदे करून, जनजागृती करून नागरिकांना नियम पाळण्यास बाध्य करून रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविता आले असते. मात्र आपले अपयश झाकण्यासाठी सामान्यांवर लॉकडाऊन लादणे, हे चुकीचे पाऊल आहे. याचा निषेध करतो.” असे माजी महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER