कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन? अमित शहा म्हणाले…

Amit Shah

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन लाखांहून अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. राज्यांतील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी निर्बंध लावले आहेत. मात्र, तरीही संक्रमणाचा वेग थांबताना दिसत नाही. या दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची चर्चा सुरू झाली आहे. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भूमिका मांडली आहे.

एका मुलाखतीत गृहमंत्री अमित शहा यांना देशात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) हा पर्याय आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, “गेल्या वर्षी आम्ही कोरोनाचा सामना करण्यासाठी तयार नव्हतो. आपल्याकडे औषध किंवा लस उपलब्ध नव्हती. आता परिस्थिती खूप बदलली आहे. डॉक्टरांनाही कोरोना संदर्भात खूप माहिती मिळाली आहे, लस उपलब्ध झाली आहे. तरीसुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत आहोत. सर्वांचे एकमत असेल त्या अनुषंगाने पुढे जाऊ. आम्ही अनेकांसोबत चर्चा करत आहोत. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग होता, तेव्हा देशात लॉकडाऊन लावण्याचा उद्देश वेगळा होता. मूलभूत सुविधा, वैद्यकीय आणि उपचारासाठी तयारी करायची होती. अमित शहा यांनी स्पष्ट केले की, “देशात तातडीने लॉकडाऊन लावण्यात येणार नाही आणि या क्षणाला तशी परिस्थितीही दिसत नाही.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button