
दिल्ली : लॉकडाऊन- ५ हा फक्त प्रतिबंधित (कंटेनमेंट) क्षेत्रांपुरता लागू राहणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊन संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्यत्र टप्प्याटप्प्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरू होतील. ८ जूनपासून आणखी काही व्यवहार शिथिल करण्यात आले आहेत. धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स ८ जूनपासून उघडणार आहेत. मात्र ‘भौतिक अंतर’ पाळणे बंधनकारक असेल, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ३० जूनपर्यंत फक्त प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊन कायम राहील.
नव्या गाईडलाईन्स –
- कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम राहणार
- कंटेनमेंट झोनमध्ये १ ते ३० जूनपर्यंत लॉकडाऊन
- रेड झोन बाहेर ८ जूनपासून मंदिर,मशीद धार्मिक स्थळे खुली होणार
- रेड झोन बाहेर ८ जूनपासून रेस्टॉरंट, हॉटेल्सही उघडणार
- रेड झोन बाहेर ८ जूनपासून शॉपिंग मॉल्सनाही उघडणार
- राज्यांतर्गत वा राज्या-राज्यात सर्व दळणवळणावर बंदी नाही
- कसलीही परवानगी, मंजुरी व ई-परमिटची गरज नाही
- दळणवळणासंबंधी राज्यांना अंतिम निर्णयाचे अधिकार
- प्रतिबंधित क्षेत्र राज्येच ठरवणार
- प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील
- शाळा सुरू करण्याबाबत निर्णय जुलैमध्ये
- राज्यांशी चर्चा करुन शाळांबाबत निर्णय घेणार
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
#FLASH: Government issues new guidelines for phased re-opening of all activities outside containment zones for the next one month. Details to follow. #UNLOCK1 pic.twitter.com/g8CCnX23Hh
— ANI (@ANI) May 30, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला