नव्या कोरोनाने चिंता वाढली; राज्यात ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम

मुंबई :- जगावर असणारं कोरोनाचं संकट (Corona Crises) टळण्याकडे लक्ष लागलं असतानाच नव्या कोरोनावताराचं सावट गडद होऊ लागलं आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारानं आता देशातही शिरकाव केला आहे. या कोरोनाचे देशात जवळपास २० पॉझिटिव्ह रुग्ण (Corona positive patient) आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातही या कोरोनाची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहील असं जाहीर केलं आहे. राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत निर्बंध शिथिल केले असले तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यामध्ये मुंबई लोकलचाही समावेश आहे. मुंबई लोकल लवकरच सुरू होईल असं सांगितलं जात असलं तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता राज्य सरकारनं राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील असं स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन?
राज्य शासनानं याबाबत आदेशही जारी केले आहेत. कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध ३१ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहेत. तसेच आपत्कालीन सर्व नियमावली आधीच्या लागू राहतील, असं सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचं ठाकरे सरकारनं सांगितलं आहे. याआधी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथिल करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाइन्स ३१ जानेवारीपर्यंत लागू राहतील असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. यासोबतच याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रणामे सुरू राहणार आहेत.

PDF:- नव्या कोरोनाने चिंता वाढली, राज्यात ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER