उद्यापासून महिलांसाठी ठराविक वेळेत लोकल सेवा सुरू

Local Train

मुंबई : १७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सरसकट सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते लोकल सुरू असेपर्यंत महिला प्रवास करू शकणार आहेत. मुंबई आणि MMR मधील महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी Q R कोडची गरज नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पुरुषांना मात्र लोकल प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुंबईसह एएमआर रिजनमधील महिलांना उद्यापासून लोकलने प्रवास करता येणार आहे. तसेच महिलांना प्रवास करताना क्यू आर कोडची आवश्यकता नसेल. सकाळी ११ नंतर महिलांना लोकल प्रवास करता येणार आहे. त्यामुळेनोकरदार महिलांना याचा फारसा फायदा होणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून विविध राजकीय पक्षांनी लोकल सुरु करण्याची मागणी केली होती. अखेर महिलांसाठी मर्यादित वेळेत का होईना पण लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे मुंबई लोकल २२ मार्चपासून बंद होती. ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश नव्हता. त्यामुळे सामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत होते. मनसेसह इतरही पक्ष लोकल सामान्यांसाठी खुली करा, अशी मागणी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER