स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : केरळमध्ये भाजपाने ५६४ जागा जिंकल्या जास्त

Kerela - BJP

दिल्ली : केरळमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. सत्ताधारी एलडीएफने या निवडणुकीत बाजी मारली आहे. भाजपासाठी हे निकाल संमिश्र स्वरुपाचे ठरले. मागच्या निवडणुकीत भाजपाने १२३६ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाने (BJP) १८०० जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी, सध्या ताब्यात असलेल्या ६०० जागी प्रभाव पत्करावा लागला आहे.

पुढच्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात केरळमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांना महत्त्व आहे. केरळच्या राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाने इथे पूर्ण ताकत लावली होती. भाजपाचे लक्ष्य २५०० जागा जिंकण्याचे होते. मागच्या निवडणुकीत जिंकलेल्या ६०० जागा गमवाव्या लागल्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी एलडीएफ-युडीएफवर एनडीएविरोधात क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप केला.

आतापर्यंत ज्या भागांमध्ये फार अल्प अस्तित्व होते. तिथे भाजपाने बऱ्यापैकी जागा जिंकल्या आहेत. राज्यातील ६०० वॉडर्समध्ये भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिरुअनंतपूरममधील १०० पैकी ३२ वॉर्डमध्ये भाजपा दुसऱ्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER