पोलिसांचा बंदोबस्त तोडून लोकल आंदोलन यशस्वी; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया

Sandeep Deshpande

मुंबई : कोरोनाच्या (Corona crises) पार्श्वभूमीवर गेल्या सहा – सात महिन्यांपासून मुंबईची लाईफ लाईन लोकल सेवा (Mumbai Life Line local service) बंद आहे. टप्याटप्प्याने उद्योग, नोकरीची ठिकाणं पुर्णपणेे सुरू झाली असली तरी लोकलसेवा मात्र अद्याप बंद आहे. त्यामुळे एरवी रोज मिनिटाला शेकडो लोकल धावूनही मुंगिलाही आत शिरायला जागा मिळत नाही तेथे लोकल बंद असल्याने लोकांचे काय हाल होत असतील याची कल्पनाही न केलेली बरी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

याच मुद्द्यावरून मनसेने आज मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा सुरू करण्यात यावी यासाठी सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले आहे. पोलिसांचा बंदोबस्त तोडून मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी अखेर लोकलने प्रवास करून आंदोलन यशस्वी केले आहे.

जेव्हा स्टेशनवर लोकल येऊन थांबणार होती, तेव्हाच मनसे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी स्टेशनवर धावत जाऊन लोकल पकडली. त्यानंतर पुढे लोकलने प्रवास पूर्ण केला.

यादरम्यान, संदीप देशपांडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हमाले, ‘लोकांना त्रास होतो. त्यासाठी आमची मागणी लोकल सेवा सगळ्यांना द्यावी अशी आहे. सरकार मात्र आम्हालाच नोटीस आणि पोलीस दंडुका दाखवत आहे. पण यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने चर्चा करावी’ अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेता मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जात आहे. पण, यामुळे चाकरमान्यांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. त्यामुळेच मुंबईतील लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER