
मुंबई : महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. जुलैअखेरपर्यंत राज्यातील अकरा लाख शेतकर्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. ही प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
महा विकास आघाडी सरकारने सत्तेत येताच दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती, पण राज्यात कोविड -१९ लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ही योजना थांबवावी लागली. सुमारे ११.२ लाख शेतकरी या योजनेतून शिल्लक राहिले असून त्यासाठी ८,२०० कोटी रुपयांचे वाटप केले जाईल, असे पाटील म्हणाले. पाटील म्हणाले की दोन हजार कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. या कर्जमाफीमुळे थकीत असलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्यास पात्र ठरविण्यात येईल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला