पर्यटनाला जाण्यासाठी कर्जाचा आधार – ५५ टक्के पर्यटक घेतात कर्ज

५५ टक्के पर्यटक घेतात कर्ज

travvel

मुंबई :- उन्हाळा हा सर्वत्र सुट्ट्यांचा काळ. त्यामुळे प्रत्येक तापत्या उन्हापासून दूर जाण्यासाठी थंड प्रदेशातील पर्यटनस्थळांचा आधार घेतात. आता या पर्यटनाला पॅकेजचे रूप आले आहे. या पॅकेजसाठी अनेक जण कर्जाचा आधार घेत असल्याचे दिसून आले आहे.

‘इंडियालेन्ड्स’ या कर्ज सुविधा देणाऱ्या ऑनलाइन पोर्टलनुसार, पर्यटनाला जाणारे ५५ टक्के पर्यटक कर्ज घेतात.
कर्ज घेणारे ८५ टक्के पर्यटक कोट्याधीश आहेत. तरिहीदेखील ते ३० हजारापासून ते अडीच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज फिरायला जाण्यासाठी घेत असल्याचे दिसले आहे.

सध्याच्या कॉपोर्रेट जगतात प्रत्येक युवा कॉपोर्रेट वर्षातून एकदा तरी फिरायला जातो. हा युवा कर्मचारी पॅकेज स्वरुपात पगार घेणारा व तंत्रज्ञानभिमूख असतो. त्यामुळेच तो पर्यटनाच्या विविध कर्ज प्रकारांचा अभ्यास करुन त्यानुसार कुटुंबाला आनंदाची सैर घडवतो, असे या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

कर्ज घेऊन फिरायला जाणारे सहसा विदेशी पर्यटनाला प्राधान्य देतात. ‘व्हिसा ऑन अरायव्हल’सह ऐनवेळी पर्यटनाचे नियोजन ते करतात. थायलंड, दुबई, श्रीलंका, इंडोनेशिया, नेपाळ, मालदिव्ज् व भुतान या आशियातील देशांना त्यांचे प्राधान्य असते. तसेच युरोप, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड या देशांनाही हे पर्यटक आवर्जून भेट देतात, असे सर्वेक्षणात समोर आले आहे.

ही बातमी पण वाचा : एसटीच्या दुरुस्तीसाठी फिरते पथक