मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोडर आणि सफाई कर्मचा-यांचे आंदोलन

मुंबई : जीव्हीके प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात मुंबई शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे लोडर आणि सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जीव्हीकेच्या अधिकाऱ्यांची कामगारांसोबत गैरवर्तणूक आणि मनमानी या विरोधात हे आंदोलन असून दोन वर्षांपासून वैद्यकीय सोयीसुविधा योजनांपासून कामगारांना वंचित ठेवले जात आहे, असा आरोप कामगारांनी केला आहे.

अकोल्यात कृषी विद्यार्थ्यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांचा ताफा अडवला

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे लोडर आणि सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या काम बंद आंदोलनात चार हजार पेक्षा जास्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी कामगारांनी जीव्हीके प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या काम बंद आंदोलनाचा परिणाम मुंबई विमानतळावर झालेला पाहायला मिळत आहे.