लोजपा रालोआतून बाहेर : नीतीशचे नेतृत्व मान्य नाही; स्वबळावर लढणार

Nitish

दिल्ली : बिहारमध्ये नीतीश कुमार यांचे नेतृत्व मान्य नाही, असे म्हणून लोजपा ( लोक जनशक्ती पार्टी ) रालोआमधून (एनडीए) बाहेर पडली. लोजपा स्वबळावर विधानसभेची निवडणूक लढणार आहे. रामविलास पासवान यांच्या लोजपाच्या केंद्रीय संसदीय पक्षाची आज चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेत दिल्ली येथे बैठक झाली. बैठकीत नीतीश कुमार यांचे नेतृत्व अमान्य करून स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

रामविलास पासवान आजारी आहेत. लोजपाने घोषणा केली की, नीतीश कुमार यांच्या जदयुचे उमेदवार ज्या मतदारसंघात असतील त्या सर्व ठिकाणी लोजपा उमेदवार उभे करेल. काही ठिकाणी भाजपासोबतही मैत्रीपूर्ण लढती होतील. लोजपा किमान १४३ मतदारसंघांत लढण्याची तयारी करते आहे. रालोआतून बाहेर पडताना लोजपाने भाजपासोबत येण्याचा मार्ग खुला ठेवला आहे. आजच्या बैठकीत ठरले की, निवडणुकीनंतर सरकार बनवण्यासाठी भाजपाला मदतीची गरज भासल्यास लोजपा भाजपासोबत आघाडी करेल. लोजपाचे सर्व आमदार पंतप्रधान मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी काम करतील.

दरम्यान, भाजपा आणि जदयुने जागावाटपात लोजपाला बाजूला ठेवले होते. भाजपा आणि जदयु प्रत्येकी ११९ जागा लढवणार आहेत. जीतनराम मांझी यांच्या ‘हम’साठी पाच जागा सोडण्यात आल्या आहेत. बिहारच्या विधानसभेत एकूण २४३ जागा आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER