पैशांअभावी जीवं जात आहेत; मुख्यमंत्री सहायता निधीचे माजी प्रमुखांना अश्रू अनावर

Omprakash Shete

औरंगाबाद : कोरोनावर (Corona) उपचारासाठी पैसे नसल्यामुळे लोकांचे जीवं जात आहेत त्यांना वाचवा असे म्हणताना भर पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्री सहायता निधीचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे (Omprakash Shete) यांना अश्रू अनावर झाले (CM Relief Fund Officer cry for unable to help poor).

कोरोनाने आता सगळीकडेच आपले हात पाय पसरले आहेत. प्रत्येक घराघरात कोरोनाचा रुग्ण आढळून येत आहे. त्यातच कोरोनासाठीच्या उपचारासाठी लोकांकडे पैसे नसल्याने अनेकांना या आजारामुळे जीव गमवावा लागत आहे.

असेच काही प्रसंग ओमप्रकाश शेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आहे. तसेच, मुख्यमंत्री सहायता निधी सुरु करण्यासाठी न्यायालयात देखील धाव घेतली आहे. त्यांनी न्यायालयाकडे याबाबतच्या तांत्रिक त्रुटी दूर करुन गरीबांना मदतीचा मार्ग मोकळा करण्याची विनंती केली आहे.

शेटे म्हणाले, “मी मुख्यमंत्री सहायता निधीत प्रमुख राहिलो आहे. ज्या ताटात जेवलो त्याला तडा द्यायचा नाही, पण खूप वाईट वाटतं. कधीकधी तर झोप येत नाही. जिथं आम्ही मंदिर तयार केलं होतं ते आता पाडण्यात आलं आहे. सामान्य माणसांना जगणं कठीण झालं आहे. खूप वाईट वाटतं. मात्र, मुख्यमंत्री सहायता निधीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळे या अधिकाराचा कसा उपयोग करायचा हे त्यांनाच ठरवायचं आहे.

एवढेच काय तर त्यांनी हेदेखील सांगितले की, आम्ही 17 लाख लोकांना मदत केली होती, आता लोक मरत आहेत. कुणाकडूनच काही आशा नाही त्यामुळे मी कोर्टात गेलोय. असंही ओमप्रकाश शेटे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER