खेळाडू जगत, एक हटके करिअर !

Sports Career

काल माझ्या मैत्रिणीच्या मुली माझ्याकडे आलेल्या होत्या . दहावी आणि इंजीनियरिंगला त्यामुळे आपोआपच पुढे काय करायचं याची चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला नृत्य आणि अभिनय या मध्ये करिअर करायचं आहे. मला काय हवय हे मुलांना कळतंय ही कौतुकास्पद गोष्ट आहे.

पण तरीही हटके विचार करताना थोडा नेमका विचार हवाच. बरेच जण हा प्रश्न विचारतात , मला खेळ आवडतो मग त्यात करिअर करू शकू का ? अशावेळी खेळाडूंच्या जगतातील काही जणांवर वाचलेल्या गोष्टी आठवतात . मध्यंतरी काही खेळाडू बद्दल ,त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वाचनात आले . ते प्रत्यक्षात तुमच्या माझ्या सारख्याच परिस्थितीतून किंवा अतिशय सामान्य कठीण परिस्थितीत होऊनही वर आलेले दिसत होते . मग त्यात मला डोळे उघडेा असलेला , बुद्धिमान राकेश भेटला. राकेशच्या डोळ्यावरची शस्त्रक्रिया अपयशी ठरली. पंधराव्या वर्षी त्याची दृष्टी गेली. त्याचे वडील मोफतलाल यांची चहाची टपरी होती .त्याला बुद्धिबळ शिकवण्याची विनंती त्यांनी जोसेफ दिसुझाना केली. तो आज पुण्यात चार ठिकाणी डोळस व अंध खेळाडूंना ही प्रशिक्षण देतो. पत्नीच्या मदतीने त्याने कारकिर्दीची घडी बसवली.

तेजस्विनी सावंत मला लहानपणापासूनच नेमबाजीची आवड .आर्थिक परिस्थितीची साथ नव्हती पण आई-वडिलांनी काही लोकांकडून मदत गोळा केली. सुरुवातीला यश येत नव्हतं म्हणून तिने नेम बाजी सोडण्याचा विचार केला होता. पण पुढे तिने जिद्दीने यश खेचून आणले.

* सगळ्यात पहिल्यांदा खेळासारखा गोष्टींमध्ये करिअर करताना काय काय समजुतींचा घोटाळे होऊ शकतात यांचा उल्लेख करणं मला गरजेचं वाटतं.

१) यामध्ये करियर करता येऊ शकतं अशी स्वप्नं बाळगणं स्वाभाविकच असतं पण त्याची पूर्तता करताना कठोर मेहनत, परिश्रम, चिकाटी ,संयम याबाबत गांभीर्याने विचार व्हायला हवा.

२) यशाबाबत – प्रसिद्धीचा आटापिटा ,थोड्या यशाने पाय जमिनीवर न रहाणे, या गोष्टी घडू शक तात.

३) खेळ आणि त्यातील करिअर हे केवळ अर्थ प्राप्तीसाठी हा उद्देश नसावा .क्रिकेटच्या खेळात खूप झटकन भरपूर पैसा मिळतो इतर खेळात मात्र नाही. आणि म्हणून प्रत्येकाने आपण सचिन तेंडुलकर बनू हेच ध्येय ठेवले तर ते योग्य होणार नाही. म्हणजेच हे केवळ प्रसिद्धी ,पैसा ,नोकरीचे माध्यम म्हणून तुम्ही विचार करत असाल तर ते योग्य नाही. सामर्थ्यशाली व्यक्तिमत्व म्हणून, आयुष्याची जडणघडण, खिलाडू वृत्ती, अपयशातही जिद्दीने उभे राहण्याची क्षमता, कोणत्याही आव्हानांना सामोरे जाणे यासारख्या गोष्टी सुद्धा मिळत असतात.

४) भारतात काही विशिष्ट खेळानाच वलय आहे हे नक्की ! क्रिकेट ,टेनिस ,बॅडमिंटन ,टेबल टेनिस बुद्धिबळ ,फुटबॉल, ऍथलेटिक्‍स यासारख्या खेळातून काही नावं, प्रकाश पदुकोण ,गोपीचंद ,पी टी उषा, महेश भूपती अलीकडे विश्वनाथ आनंद ही प्रसिद्धीच्या झोतात आली . पण सगळ्यांच्याच वाट्याला एवढे मोठे यश येईलच असे नाही मात्र त्यांचा आदर्श ठेऊन जीवनात यशस्वी ठरता येते.

प्रत्येकालाच आपल्या मुलाने सचिन तेंडुलकर व्हावे असे वाटते, पण सचिन सगळ्याच क्रीडा प्रकारातील खेळाडूंसाठी आदर्श आहे . तो केवळ क्रिकेटपटू म्हणून नव्हे तर जमिनीवर पाय ठेवून वाटचाल केल्यास आपण किती मोठे होऊ शकतो याचे उदाहरण म्हणून !

इंग्लंडचे क्रिकेट समीक्षक एड स्मिथ फुटबॉलपटू वेन रूनी याला,” सचिनचा आदर्श ठेवा !”असा सल्ला दिला .त्यावरून त्याची महानता, एकमेवाद्वितीयत्व कळते.

प्रशांतच्या एक नुकताच दहावीत गेलेला विद्यार्थी . त्याच्या शिक्षकांनी ,” यावर्षी दहावी आहे, खेळणे बंद, मॅचेस बंद” असं सांगितलं. अशावेळी ताणामुळे विद्यार्थी पण ते स्वीकारायला तयार होतात . प्रशांतच्या पालकांनी त्याला जेव्हा सांगितलं की,” तुला खेळ मनापासून आवडतो ना , मग बिनधास्त खेळत जा.”क्षणभर प्रशांतचाही यावर विश्वास बसला नाही. पण मन मैदानात आणि शरीर अभ्यासात त्याने अभ्यास होणे शक्य नाही यावर पालकांचा विश्वास होता.

असे आश्वासक शब्द आणि नैतिक पाठिंबा असेल तर मुले सगळं सांभाळून देखील अभ्यासात लक्ष घालू शकतात. आता थोडा विचार खेळ हा करिअर म्हणून निवडल्यास कुठल्या संधी आहेत ?

१) क्रीडा क्षेत्राला ही प्रचंड व्यावसायिकतेचे स्वरूप आलेले आहे. व्यवसायात लागणाऱ्या सेवा आणि विशेष कुशलता येथेही लागतात. खेळाडू प्रशिक्षक, संयोजक ,समालोचक, क्रीडा पत्रकार क्रिडांगणाची देखभाल, सल्ला देणारी तज्ञ किंवा क्रीडा मानस शास्त्रज्ञ. त्यांची गरज लागते.

२) पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांना शारीरिक शिक्षक म्हणून शाळांमधून नोकरी मिळू शकते.

३) इतर पूरक अभ्यासक्रम पूर्ण केल्यास क्रीडा पत्रकार म्हणूनही काम करता येते.

४) आपल्या आवडत्या एखाद्या खेळासाठी क्रीडा स्पर्धांसाठी समालोचन किंवा खेळासाठी धावते निवेदन केल्या जाऊ शकते.

५) याशिवाय स्वतःची व्यायाम शाळा / जिम चालवणे , क्रीडा साहित्याचे दुकान चालवणे.

६) अधिक कौशल्य म्हणजे क्रीडा साहित्य निर्मिती आणि त्याबरोबर दुरुस्ती देखील पार पाडता येते.

७) क्रीडांगणे तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन तालुका आणि जिल्हा पातळीवर स्पर्धांसाठी क्रीडांगण तयार करून दिली जातात .

८) दुखापती आणि त्यावरील प्राथमिक उपचार क्लीनिकची गरज असते. विशिष्ट क्रीडा प्रकारातील दुखापतीतून साठी अद्ययावत ज्ञान असलेली फिजिओथेरपी हा कोर्स पूर्ण करता येईल.

९) विविध विषयांवर क्रीडा वाड .म् यांची ,लिखांव,साहित्य माहिती यांची निर्मिती करावी लागते.

आपला देश एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा असूनही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये दोन किंवा तीन पदके मिळवतो .तर छोटी-छोटी राष्ट्र दहा ते बारा पदके घेऊन जातात. या पार्श्वभूमीवर पालकांनी आणि मुलांनी क्रीडा प्रकारांकडे एक करियरचा हटके प्रकार म्हणून बघायला हरकत नाही .

फ्रेंडस् ! कोणतेही मोठे ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रमांना पर्याय नाही. स्वामी विवेकानंद यांचे एक वाक्य आहे,”Every thing is easy,when you are busy .Nothing is easy when you are lazy ! “हे लक्षात घेऊन जर नवीन वाट जर आपण निवडणार असू तर यश तुमचेच आहे .

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button