‘लिव्ह इन’ म्हणजे शरीरसंबंधांचा परवाना नाही’ – चित्रा वाघ

मुंबई : ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलांच्या हेतूविषयी शंका उपस्थित केल्याबद्दल भाजप (BJP) नेते चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांना फटकारले आहेत. लिव्ह इन म्हणजे फक्त सोबत राहणे, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही. हे अबू आझमींना माहित नसेल. नवऱ्याविरोधात लग्नाची बायकोही बलात्काराची तक्रार करू शकते. स्वतःला बायकोचे मालक समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

चुकीचा कायदाच देशात आहे. कायद्यानुसार कोणतीही स्त्री लग्नाशिवाय पुरुषाबरोबर राहू शकते. “व्हॉट इज धीस लिव्ह इन रिलेशनशीप? तर तुम्ही एका महिलेला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता, कुठलाही गुन्हा नाही, वर्षभर एकत्र राहिले आणि नंतर सांगितले माझा बलात्कार झाला.” अशा शब्दात अबू आझमी यांनी संताप व्यक्त केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER