‘लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाडचे लग्न; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले खास निमंत्रण

Uddhav Thackeray

मुंबई :  ‘सारेगमप’ फेम गायिका कार्तिकी गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतीच तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी कार्तिकी तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच ‘वर्षा’वर पोहचली होती. यावेळी कार्तिकीसोबत तिचे वडील गायक-संगीतकार कल्याणजी गायकवाड उपस्थित होते. कार्तिकीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लग्नाचे खास निमंत्रण दिले आहे.

त्यामुळे आता कार्तिकीच्या लग्नात ठाकरे परिवार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कार्तिकीच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली, तरी ती डिसेंबर महिन्यात लग्नबेडीत अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. पुण्याचा व्यावसायिक रोनित पिसे याच्यासोबत कार्तिकीचे लग्न होणार आहे.

लॉकडाऊनच्या काळातच म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीला कार्तिकीचा शुभविवाह ठरला आणि साखरपुडाही पार पडला होता. कार्तिकीने सोशल मीडियावर साखरपुड्यातील काही फोटो शेअर करत चाहत्यांना ही सुखद बातमी दिली होती. मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत रविवार २६ जुलैला साखरपुडा  झाला होता.

‘सारेगमप लिटिल चॅम्प’ची विजेती ठरलेली पार्श्वगायिका कार्तिकी गायकवाडने ‘घागर घेऊन’, ‘नवरी नटली’ यासारख्या खर्ड्या आवाजातील गाण्यांनी रसिकांना वेड लावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER