जगातील सर्वाधिक खराब पासवर्डची यादी जाहीर

Password

नवी दिल्ली :- २०२० मध्ये सगळ्यात जास्त १२३४५६ हा पासवर्ड वापरला गेला आहे. २ कोटी ३७ लाख लोकांनी या पासवर्डचा वापर केला आहे. याची माहिती पासवर्ड मॅनेजर नॉर्डपासने वार्षिक अहवालातून दिली आहे. १२३४५६ या पासवर्डचा उपयोग कोट्यवधी लोकांनी केला आहे आणि तो हॅक कास सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो. या यादीत सगळ्यात खराब २५० पासवर्डबाबत खुलासा करण्यात आला आहे. ‘123456789’ हा पासवर्ड दुसऱ्या स्थानावर आहे.

123456 हा पासवर्ड या वर्षातील सर्वांत खराब पासवर्ड होता. २०१५ मध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीने अहवालात ही माहिती दिली आहे. लोक सोपा पासवर्ड लक्षात राहण्यासाठी ठेवतात. पण हे पासवर्ड लगेच हॅक होतात. अशी माहिती पुढे आली आहे.

सगळ्यात सुरुवातीला २० वापरले जाणारे पासवर्ड ‘123456’, ‘123456789’, ‘picture 1′, पासवर्ड’, ‘12345678’, “111111′, ‘123123’, ‘12345’, ‘1234567890’ आहेत, ‘senha’, ‘1234567’, ‘qwerty’, ‘abc123’, ‘Million2’, ‘000000’, ‘1234’, ‘iloveyou’, ‘aaron431’, ‘password1’ आणि ‘qqww1122 हे पासवर्ड आहेत. यातील पासवर्ड सगळ्यात जास्त हॅक केले जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER