बिहारसाठी भाजपाच्या स्‍टार प्रचारकांची यादी जाहीर; मोदी, शहा, फडणवीसांचा समावेश

PM Modi & Devendra Fadnavis & Amit Sahah

पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी भाजपाने आज ३० स्‍टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पहिल्या स्थानावर आहेत. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), उत्‍तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ (Yogi Adityanath) आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही या यादीत समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्‍यमंत्री नीतीश कुमार, हे सोबत निवडणूक प्रचार करणार आहेत.

सुरेश रुंगटा यांनी रविवारी भाजपाच्या स्‍टार प्रचारकांची यादी जारी केली. या यादीत पहिल्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसऱ्या क्रमांकावर भाजपा राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जे. पी. नड्डा, तिसऱ्या क्रमांकावर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, तर चौथ्या क्रमांकावर गृहमंत्री अमित शहा आहेत. यात बिहारचे उपमुख्‍यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचाही समावेश आहे.

यादीत योगी आदित्यनाथ
स्टार प्रचारकांच्या यादीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे भाजपाचे सरकार असलेल्या इतर कुठल्याही राज्यातील मुख्यमंत्र्याचा या यादीत समावेश नाही.

मोदी-नीतीश सोबतच करणार प्रचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्‍यमंत्री नीतीश कुमार सोबतच प्रचारसभा घेतील. सभांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. जेडीयू नेते संजय झा म्हणाले, यामुळे लोकांमध्ये पसरवले जात असलेले गैरसमज दूर होतील. भाजपा आणि जेडीयूची आघाडी भक्कम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER