मद्यविक्रेत्यांना तोंडी आदेश; परवाना शुल्क ताबडतोब भरा !

Liquor sellers dcry unofficial order to pay licence fee immediately

लॉकडाऊन – ३ मध्ये सरकारने दारूची दुकाने सुरू करण्याला परवानगी दिली असताना, अबकारी विभाग या दुकानदारांना परवाना शुल्क ताबडतोब भरण्यासाठी निरोप पाठवत आहे!

या संदर्भात ‘इंडियन एस्प्रेस’ मध्ये प्रकाशित लेखात म्ह्टले आहे की, याआधी राज्य अबकारी विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी आदेश पारित केला होता की, दारूच्या दुकानांच्या परवान्याचे नूतनीकरण शुल्क ३१ मार्च, या नियमित मुदतीऐवजी ३ हप्त्यात भरा. यासाठी पहिला हप्ता ३० जून (२५ टक्के रकम), दुसरा हप्ता ३० सप्टेंबर (२५ टक्के रकम) आणि तिसरा हप्ता ३१ डिसेंबर (५० टक्के) ठरवून देण्यात आला होता.

दारूविक्रेत्यानी नाव प्रकाशित व करण्याच्या अटीवर सांगितले की, आम्हाला अबकारी खात्याकडून कळवण्यात आले आहे की लॉकडाऊन – ३ मध्ये दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली असली तरी, जे दुकानदार परवाना नूतनीकरण शुल्क ताबडतोब भरतील त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येईल. म्हणजे आम्ही परवाना नूतनीकरणाचे संपूर्ण किंवा २५ टक्के शुल्क भरल्याशिवाय आम्हाला दुकाने उघडता येणार नाही.

लॉकडाऊनमुळे सरकारसमोर निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीतून सुटण्याचा मार्ग म्हणून सरकारने हा मार्ग निवडला असावा.