पुणे जिल्ह्यात चार दिवस मद्यविक्री बंद

liquor

पुणे : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. मतदान आणि मतमोजणी दरम्यान चार दिवस जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. निवडणुकीचा प्रचार २९ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ५ वाजता संपत असून, तेव्हापासून मद्यविक्री बंद होणार आहे. ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी दिवसभर मद्यविक्री बंद असणार आहे. तर मतमोजणी ३ डिसेंबरला मतमोजणी होणार असून, ती संपेपर्यंत मद्यविक्री बंद असणार आहे. या दरम्यान मद्यविक्री करताना कोणी आढळल्यास त्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER