लॉकडाउनमध्ये एसीपी कार्यालयात रंगली दारू पार्टी!

Maharashtra Today

नागपूर :- कोरोनाच्या (Corona) लॉकडाऊनमध्ये गर्दी टाळण्यासाठी पार्ट्या-मेजवान्यांवर बंदी आहे. पोलिसांकडून यावर लक्ष ठेवले जाते आहे. मात्र नागपूरमध्ये काही ठिकाणी पोलिसच याला सुरुंग लावत आहेत. याचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. मात्र तो केव्हाच आहे ही वेळ कळली नाही.

लॉकडाउनदरम्यान संपूर्ण शहर पोलिस रस्त्यांवर असतानाच सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयातील तीन – चार कर्मचाऱ्यांनी चक्क कार्यालयालयात दारू – मटण पार्टी (Alcohol-Mutton party)केली. या पार्टीचा व्हीडिओ व्हायरल झाला. या व्हीडिओमुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा पुन्हा एकदा मलीन झाली आहे.

काही दिवसांपूर्वी कार्यालयातील रात्रीच्या सुमारास निळा शर्ट घातलेला एका युवक दारूच्या बाटल्या आणि मटण घेऊन शांतीनगरमधील लकडगंज सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात आला. त्याने खिशातून दारूच्या तीन बाटल्या काढल्या. एका टेबलावर ठेवल्या. त्यानंतर कार्यालयातील तीन कर्मचारी आणि त्या युवकाने सुमारे दोन तास दारु व मटण पार्टी केली. यावेळी तीन कर्मचाऱ्यांनी युवकाला काही तरी काम करून देण्याचे आश्वासनही दिले! सहा मिनिटांचा हा व्हीडिओ समाजमाध्यमांवर व्हायरला झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER