आमदार असावा तर निलेश लंकेसारखा ; कोव्हिड सेंटरमध्येच ठोकला मुक्काम !

Maharashtra Today

पारनेर : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या संकटमय काळात आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)आपल्या पारनेर मतदार संघात कोरोनाबाधितांसाठी धडपड करीत आहेत .या गंभीर परिस्थितीतही दिवसातील जवळपास २० तास कोव्हिड सेंटरमध्ये थांबून बाधित रूग्णांची ऑक्सिजन लेव्हल,टेंमपरेचर तपासण्यापासून आस्थेवाईकपणे चौकशी करीत अहोरात्र रुग्णसेवाचा वसा घेतलेले पारनेर – नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके हे राज्यभर चर्चेत आले आहेत. काल ( मंगळवारी ) तर त्यांनी चक्क भाळवणीच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरातच मुक्काम (Nilesh Lanke Stay at Covid Center) ठोकला.

कोरोनाच्या या संकट काळात अनेक राजकिय पुढारी घरात बसून असतानाच ,बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आ. लंके यांनी आपल्या घरादाराकडे पुर्णपणे दुर्लक्ष करत पुर्ण वेळ हजारो रुग्णांना बेड,व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे, इंजेक्शन उपलब्ध करून गरजू रुग्णांपर्यंत पोहचविणे, वृद्ध माता पिता, तरुण बंधु भगिनींच्या प्रत्येक बेडवर जात त्यांची तपासणी करणे, त्यांना मायेचा आधार देणे , कोण जेवले नाही ? कुणाला काही त्रास होतो का? कुणा वृद्ध आजी -आजोबांच्या सोबत नातेवाईक नसल्यास त्यांच्या मुलाचे कर्तव्य पार पाडणे, तरुण बंधु भगिनींचा भाऊ होणे, चिमुकल्यांचा मामा होणे, मायेच्या आधाराबरोबरच रुग्णांना मानसीक आधार देत त्यांच्यात नवीन उर्जा निर्माण करणे या सर्व भूमिका एकाच वेळी पार पाडणारा अष्टपैलु कलाकार आयुष्याच्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका पार पडत आहेत .

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता गतवर्षी कर्जुले हर्या येथे शरदचंद पवार आरोग्य मंदीर सुरू करून किमान साडे चार हजार कोरोना बाधित रुग्णांना मदतीचा हात दिला होता.एकही रुग्ण न गमवता यशस्वी कोवीड सेंटर चालविले होते. येथील व्यवस्थेचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी कौतुक करीत आ. लंके यांच्या या कार्यासाठी पवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने रुग्णवाहिका भेट दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button