मराठासारखाच एससी / एसटी आरक्षणालाही कोर्टात लागू शकतो धक्का – प्रतीक बोंबार्डे

SC - ST Reservation - Court Order

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती देण्याचा मुद्दा तापला असतानाच सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित जाती व जमाती कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या आरक्षणाला धक्का बसण्याची शक्यता आहे, असे मत याचिकाकर्त्यांचे वकील प्रतीक बोंबार्डे यांनी व्यक्त केले. यावर २५ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

बोंबार्डे म्हणाले की, या सुनावणीपूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संख्येचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करायचे होते, पण राज्य सरकारने ते अजूनही केले नाही त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

असे झाले तर आरक्षणाच्या गोंधळात आणखी भर पडू शकते. मराठा आरक्षणला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगनादेश दिला आहे. त्यामुळे २०२० – २१ साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आले आहे. पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मराठा आरक्षणप्रकरणी आता घटनात्मक खंडपीठ पुढची सुनावणी करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER