मुंबई, पुणेसह कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार

- कोल्हापूरसाठी ४८ तासांचा यलो अलर्ट

Lightning strikes.jpg

मुंबई :- मुंबईसह उपनगर ठाणे, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत  दुपारनंतर वादळवारा, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू झाला आहे. पुढच्या तीन – चार तासांत रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

कल्याण-डोंबिवलीत मुसळधार

दिवा, डोंबिवली, कल्याण आणि ग्रामीण भागातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतो आहे.

मलंगगड परिसरात जोराची हवा सुटली असून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. ग्रामीण भागात शेतकरी चिंतातुर झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. शहरात अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. गडहिंग्लज, चंदगड भागातही जोरदार पाऊस पडतो आहे. घाटमाथ्यावरही पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ४८ तासांचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड तालुक्यातील अनेक ठिकाणीही मुसळधार पाऊस सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER