खासदार शिंदेंकडून रायगडावर लायटिंग ; अजित पवार म्हणाले, उत्साही लोकांचा अजाणतेपणा!

रायगड :- शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti) रायगडावर (Raigad) करण्यात आलेल्या डिस्को लाईटवरून (Raigad Fort Lighting) वादाला तोंड फुटले आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आधीच उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही नापसंती दर्शवली. “रायगडावर लायटिंग केली, हे उत्साही लोकांमुळे घडतंय. त्यांचा अजाणतेपणा दिसून येतोय. पण महाराजांचा वारसा आहे, तिथे असे घडणे चुकीचे आहे.” असे अजित पवार म्हणाले. शिवसेना (Shiv Sena) खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी पुरातत्त्व खात्याकडून परवानगी घेऊन स्वत:च्या निधीतून रोशनाई केली.

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ल्यावरील अनेक भाग रात्रीच्या अंधारात उजळून निघाले. मात्र आता यावरून वाद उफाळला आहे. दरम्यान, या लायटिंगवरून छत्रपती संभाजीराजे यांनी सर्वांत आधी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. “भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल.” असा हल्लाबोल संभाजीराजेंनी ट्विटरवरून केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER