चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली; ठाकरे सरकारचा निर्णय

Lifting of liquor ban in Chandrapur - CM Uddhav Thackeray

चंद्रपूर : चंद्रपूरमधील (Chandrapur) सामाजिक कार्यकर्त्यांसह बऱ्याच गावांनी दारूबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. मात्र, ठाकरे सरकारने (Thackeray Government) दारूबंदी उठवण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मागील काही काळापासून चंद्रपूरमधील दारूबंदी हटवण्यासाठी प्रयत्न केले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस सरकारने (Fadnavis Government) लावलेली दारूबंदी आघाडी सरकारने उठवल्याने आता यावरून पुन्हा एकदा राजकारणात वाद होण्याची शक्यता आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, “दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती. अवैध आणि डुप्लिकेट दारू या जिल्ह्यात विकली जात होती. यामुळे दारूबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले होते. तसेच यासंदर्भात एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने दारूबंदी उठवावी यासाठी अहवाल दिला होता. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता.”

दरम्यान, चंद्रपुरतील दारूबंदीबाबत मतभेद आहेत. काहींनी दारूबंदी कायम ठेवावी, तर काहींनी उठवावी, अशी मागणी केली, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच दारूबंदी उठवण्याच्या निर्णयाचा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यानी विरोध केला आहे. हा निर्णय अत्यंत अयोग्य आहे. जिल्हयातल्या ६ लाख महिलांच्या जीवनावर हा परिणाम करणारा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. अभय बंग यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button