लाइफलाइनवर कडक कारवाई हवी…

Sharad Pawar

Shailendra Paranjapeकरोना (Corona) रुग्णांची वाढती संख्या आणि प्रशासनाला रोगाला आळा घालण्यात येत असले अपयश, या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वोच्च पातळीवरून लक्ष घालण्यात आलंय. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेऊन यंत्रणेची झाडाझडती घेतलीय. त्याबरोबरच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही पश्चिम महाराष्ट्रातल्या करोना स्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतलीय.

सरकारी प्रसिदिधीपत्रकानुसार मास्क घालणं आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलंय आणि घरबाहेर पडताना नागरिक मास्क वापरतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जावडेकर यांनी केल्याचे सरकारी प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलंय. खासदार शरद पवार यांनी सूटना केलीय आणि निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा करोनाची साथ नियंत्रणात आणायला आणि विविध उपाययोजनांसाठी करून घ्यायला हवा, अशी सूचना केलीय.

सरकारी प्रसिद्धीपत्रक नजरेखालून घातले तर या आणि अशा सर्व बैठकांमधून अधिकाऱ्यांना काही मार्गदर्शन खरोखर होते का, हा मिलियन डॉलर प्रश्न ठरावा. दुसरीकडे पुण्यात आठशे खाटांच्या जम्बो कोविड सेंटरच्या उद्घाटनानंतर तेथे झालेले एका पत्रकाराची हेळसांड, त्यातून त्याचा उद्भवलेला मृत्यू, त्यावर माध्यमांनी उठवलेला सामूहिक आवाज यातून अखेर हे जम्बो कोविड सेंटर लाइफलाइन नावाच्या एजन्सीकडून काढून घेण्यात आलंय आणि प्रशासनानं त्याचा ताबा घेतलाय.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या जम्बो सेंटरवर एका दिवसात तज्ज्ञ डॉक्टरस्सह निमवैद्यकीय कर्मचारी, कार्यालय कर्मचारी यासह दोनशे जणांची टीम नेमली आहे. लाइफलाइन ही एजन्सी जम्बो कोविड सेंटर चालवण्यासाठी सक्षम नसल्याचं आढळून आलंय. त्यामुळे जम्बो सेंटरच्या उद्घाटनानंतर रुग्णांचे हाल झाल्याचेही लक्षात आले आहे. याच कोविड सेंटरमधे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू ओढवला होता.

वास्तविक, पत्रकाराचा मृत्यू ओढवल्यानंतर त्याबद्दल मोठ्या प्रमाणावर जनआक्रोश बघायला मिळाला. त्यामुळे किमान या जम्बो सेंटरचा ताबा संबंधित लाइफलाईन एजन्सीकडून प्रशासनानं घेतला आहे. पण त्या काळात उपचाराला सामोरे जावे लागले, त्या सर्व रुग्णांच्या नातेवाइकांना, रुग्णांना ज्या यातनांना सामोरे जावे, यालागले त्याची भरपाई प्रशासन किंवा सरकार कसं करणार आहे, हा प्रश्न अनत्तरितच आहे.

पत्रकार रायकर यांना न्याय मिळाला नाही तर आठ दिवसांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा पुणे श्रमिक पत्रकार संघानं दिला आहे. आता लाइफलाइन एजन्सीला दूर करण्यात आलं आहे. पण त्यांच्यावर किंवा पत्रकार रायकर यांच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण हा प्रश्न इतर अनेक प्रकरणांसारखाच गूढ ठरू शकेल कारण कोणतेही प्रकरण धसास लावण्याचा आपला इतिहास नाही. त्यामुळे किमान पांडुरंग यांचा मृत्यू कारणी लागून आरोग्य व्यवस्शेत जम्बो कोविड सेंटरच्या कामात फरक पडेल, हे डोळ्यात तेल घालून पत्रकारांनी बघायला हवं. तसं झालं तरच पत्रकार रायकर यांच्या मृत्यूची काही प्रमाणात का होईना भरपाई होऊ शकेल.

जमबो सेंटरचा ताबा प्रशासनाने घेतला आहे पण लाफलाइन एजन्सी कोणाची आहे, त्यांना निविदा भरल्यानंतर जम्बो सेंटर चालवण्याचे काम देण्यात आले पण ते सक्षम नसल्याचे आता सिद्ध झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध काय कारवाई केली जाणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्याचा फॉलो अपही सर्व पत्रकारांनी करायला हवा आणि या एजन्सीच्या चालकांना कडक शिक्षा होईल, हेही बघायला हवे.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER