महापालिका क्षेत्रत सुरु असलेल्या प्रकल्पांचा आयु:कांनी घेतला आढावा

sanjay jaiswal

ठाणे :- ठाणे महापालिका कार्यक्षेत्रत सुरू असलेल्या प्रकल्पामधील खारकर कंपाउंड, कळवा पूल, खारीगांव ब्रिज, पारिसक चौपाटी, साकेत बाळकूम वॉटरफ्रंट, जिम्नॅस्टीक पार्क, ज्युपिटर मल्टीपार्कीग सेंटर, सेंट्रल पार्क, सायन्स सेंटर, अर्बन जंगल आदी प्रकल्प कामांची महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी करुन सर्वच प्रकल्पांच्या कामाची गती वाढविण्याचे आदेश दिले.

मंगळवारी आयुक्तांनी विटावा येथील स्पोर्टस कॉम्प्लेक्सपासून पाहणी दौ:यास सुरू केली. या पाहणी दौ:या नगरसेवक मुकुंद केणी, नजीब मुल्ला, संजय भोईर, नगरसेविका उषा भोईर अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, नगर अभियंता रविंद्र खडताळे, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, मनीष जोशी, अशोक बुरपल्ले, उपनगर अभियंता प्रवीण पापळकर, कार्यकारी अभियंता रामदास कोल्हे, मनोज तायडे, सहाय्यक आयुक्त चारु शीला पंडीत आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

विटावा येथील स्पोर्टस कॉम्प्लेक्सच्या कामाची पाहणी करताना हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देतानाच सिमेंटचा वापर कमी करुन पर्यावरणपूरक ग्रीन वॉल बनविण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर क्रिडा साहित्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यास सांगितले. कळवा ब्रिज येथे सुरू असलेल्या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेवून येथील कामाची गती वाढविणो तसेच जूनपर्यत कळवा ब्रिजचे काम पूर्ण होईल या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच खारेगांव फाटक येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी करु न या पूलाचे काम मे अखेरपर्यत पूर्ण होईल या दृष्टीने काम जलदगतीने पूर्ण करु न मोकळ्या जागेत मॉडेल प्रपोजल सादर करण्याबाबतही सूचना संबंधीत अधिका:यांना दिल्या. पारिसक चौपाटी, साकेत बाळकूम वॉटरफ्रंट डेव्ह्ल्पमेंट तसेच इतर सर्व वॉटर फ्रंटच्या कामाची गती वाढविण्याबाबतच्या सूचनाही आयुक्तांनी येथील पाहणी दरम्यान दिल्या.

राबोडीतील के.व्हीला येथील नाल्याची साफसफाई करु न कलव्हर्ट बसविण्यासाठी शॉर्ट नोटीस टेंडर काढून नाल्याचे काम पावसाळयापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले. दरम्यान ज्युपिटर लेवल पार्कीग या प्रकल्पाला भेट देवून पार्कीगचे पहिले चार मजले लवकरात लवकर सुरू करण्याबाबत सूचित केले. वर्तकनगर प्रभाग समतिीमधील जिम्नॅस्टिक पार्कच्या कामाचा आढावा देखील यावेळी आयुक्तांनी घेतला. ठाणो महानगरपालिकेच्या शाळा क्र . 44 येथे बांधण्यात आलेल्या सायन्स सेंटरला देखील त्यांनी भेट दिली. या सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या विविध विज्ञान प्रकल्पाची पाहणी करु न या प्रकल्पाअंतर्गत उर्जासंबंधी विविध प्रकल्प, पर्यावरण या विषयावर आधारीत जी विविध उपकरणो मांडण्यात आली आहेत. या माध्यमातून विद्याथ्र्याना विज्ञान शिकणो सहज सोपे होईल असे सांगत या विज्ञान सेंटरबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

32 एकर परिसरात उभारण्यात आलेल्या अद्ययावत सेंट्रल पार्क मध्ये तलाव, चिल्ड्रन्स प्ले एरिया, कारंजे आणि स्पोर्टस असे चार झोन आहेत. यातील चिल्ड्रन प्ले एरिया या झोनचे काम अंतिम टप्यात असून उर्वरीत झोनची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. यावेळी हिरानंदानी पातलीपाडा येथील अर्बन जंगलाची आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली.