राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा; ग्रंथालय प्रतिनिधी राज ठाकरेंच्या भेटीला

Raj Thackeray

मुंबई : देशात कोरोनाचे (Corona) संकट अद्यापही आहे . या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करण्यात आली . गेल्या काही दिवसांपासून अनलॉक (Unlock) सुरू आहे. त्यानंतर डॉक्टर, कोळी महिला, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली .

आज राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, या मागणीसाठी ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी त्यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली .पुस्तकं ही सकारात्मक ऊर्जा आणि वैचारिक आनंद देतात. कोरोनाच्या नैराश्यपूर्ण वातावरणात त्याची फार आवश्यकता आहे. म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये बंद केलेली ग्रंथालये पुन्हा सुरू करण्यात यावीत. त्यामुळे वाचन चळवळ वृद्धिंगत होईल. त्यावर अवलंबून असलेल्या अर्थचक्रालाही गती मिळेल, असे ग्रंथालय प्रतिनिधींनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) सांगितले.

राज्यात पुनश्च हरिओम अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. याच अनुषंगाने राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यात यावी, ही मागणी घेऊन ग्रंथालयांचे विश्वस्त आणि संचालक मंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER