फॉर्म्युला वन मध्ये लुईस हॅमिल्टनचे पोल पोजीशनचे शतक

Maharashtra Today

फॉर्म्युला वन (Formula One). रेसिंगचा सात वेळेचा विश्वविजेता ब्रिटनचा (Britain) लुईस हॕमिल्टन (Lewis Hamilton) याने आणखी एक यशाचे शिखर सर केले आहे.फॉर्म्युला वन रेसिंगच्या इतिहासात पोल पोजीशनचे (Pole position) शतक करणारा तो पहिला रेसिंगपटू ठरला आहे. शनिवारी स्पॅनिश ग्रँड प्रिक्स स्पर्धेत त्याने मर्सिडीजसाठी सर्वात वेगवान लॕप नोंदवून हा टप्पा गाठला. पोल पोजीशनच्या बाबतीत हॅमिल्टन इतरांच्या कितीतरी पुढे आहे. दुसऱ्या स्थानावरील मायकेल शुमाकरच्या नावावर 68 पोल पोजीशन आहेत म्हणजे तब्बल 32 पोल पोजीशनच्या फरकाने हॅमिल्टन इतर सर्वांच्या पुढे आहे.

बार्सिलोना येथे हे यश मिळवल्यावरहॅमिल्टन म्हणाला की, पहिले यश मिळवताना जसा आनंद होतो तसाच मला आनंद झाला आहे.

पोल पोजीशनसाठीच्या पात्रता स्पर्धेत रेड बूलचा मॕक्स वर्स्टाप्पेन हा फक्त 0.036 सेकंदाच्या वेळेसह दुसरा आला. मर्सिडीजचा वाल्टेरी बोत्तास तिसरा आला. या स्पॕनिश सर्किटवर 2013 पासून सतत मर्सिडीजच्याच ड्रायव्हरने पोल पोजीशन प्राप्त केलेली आहे. आता रविवारी हॕमिल्टनने स्पॕनिश ग्रँड प्रिक्स जिंकली तर ते त्याचे 98 वे विजेतेपद असेल.

2007 मध्ये मॕक्लारेनचे प्रतिनिधित्व करत होता तेंव्हा हॅमिल्टनने पहिल्यांदा पोल पोजीशन मिळवली होती. यंदा आतापर्यंत पोल पोजीशन मिळवलेल्या कोणत्याही ड्रायव्हरने ग्रँड प्रिक्स जिंकलेली नाही. पण बार्सिलोनातील सर्किटवर पोल पोजीशन मिळवणारा नेहमीच फायद्यात राहिला आहे. येथील 30 पैकी 22 शर्यतीत पोल पोजीशनवरुन सुरुवात करणाराने जिंकल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून आणि एकूण पाच वेळा हॕमिल्टन हा बार्सिलोनाच्या ट्रॕकवरील विजेता आहे. यंदा त्याने दोन ग्रँड प्रिक्स आधीच जिंकलेल्या आहेत.

काय असते पोल पोजीशन?

फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये जिथे क्षण न् क्षण महत्त्वाचा असतो तिथे रेसच्या सुरुवातीला स्पर्धकांचा क्रम कसा असणार, कोण पुढे आणि कोण मागे असणार हे ठरविण्यासाठी जी पात्रता स्पर्धा आदल्या दिवशी घेण्यात येते त्यात जो पहिला येतो त्याला पोल पोजीशन मिळते. ही पोजीशन मिळाल्यावर तो सर्वात पुढच्या रांगेत मध्यभागीच्या स्थानावरुन शर्यतीची सुरूवात करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button