कोल्हापूर अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारीबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन

letter to CM Thackeray regarding salary priests in Kolhapur Ambabai temple

कोल्हापूर : करवीर निवासीनी अंबाबाईच्या मंदिरात अधिक चांगले व्यवस्थापन व्हावे यासाठी मंदिरात काम करणाऱ्या पुजारी यांचे सर्व अनुवंशिक हक्क आणि विशेषाधिकार नाहीसे करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे कामकाज सुरू व्हावे, मंदिरात पगारी पुजाऱ्यांची नेमणूक करावी, या मागणीचे निवेदन कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ई मेलव्दारे निवेदन केले आहे.

२०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३५ चे गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले. याला विधानसभा व विधान परिषदेमध्ये श्री करवीर निवासीनी महालक्ष्मी अंबाबाई विधायक एकमताने मंजूर झाले आहे. त्याला कोणत्याही आमदारानी विरोध केलेला नाही.

शाहू वैदीक विद्यालयातील पुरोहित पाठशाला शाहू महाराजानी स्थापन केलेल्या आहेत. तेथे शिकलेले विद्यार्थी पुजारी असावा तसेच लष्करातून नाईक या हुद्यावरुन निवृत्त झालेल्या व्यक्तीची पुजारी म्हणून नेमावे. अशी मागणी विधानसभेत आमदारांनी केली होती. त्याला उत्तर देताना विधी व न्याय राज्य मंत्री यांनी तत्वथा मान्यता दिली आहे.विधानसभा मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरच विधेयक एकमताने मंजूर झाले आहे.

कायद्यातील कलम ८ नुसार श्री अंबाबाई मंदीर व्यवस्तापन समिती गटीत करण्याची व्यवस्था आहे. पण आज अखेर कमीटी गटीत करण्यात आलेली नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी कोल्हापूर, अध्यक्ष व सचिव यांनी वेळोवेळी पगारी पुजारी नेमण्यासाठी प्रक्रिया राबवून अनेक पुजारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यापूर्वी घेतल्या आहेत. आज अखेर त्याचीही निवड जाहीर झालेले नाही. मंत्रालयातील व प्रशासनातील काही अधिकारी झारीतील शुक्राचार्य होऊ पहात आहेत. त्यांना रोखण्याची जबाबदारी सरकारचे प्रमुख म्हणून आपणावर आहे. जनतेला व अंबाबाई भक्तांना न्याय देण्याच्या आपल्या भूमिकेवर आजही आमचा विश्वास आहे. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यास कोणत्याही दबावाला बळी न पडता व स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पुन्हा तिव्र आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.