कंत्राटदारांच्या हिताचे महागडे पाणी मुंबईकरांना ‘पाजण्याचा’ घाट कोण घालतेय?- आशिष शेलार

Ashish Shelar

मुंबई : कंत्राटदारांच्या हिताचे महागडे पाणी मुंबईकरांना ‘पाजण्याचा’ घाट कोण घालतेय? असा थेट सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) पत्रही पाठवलं आहे.

समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प मुंबई महापालिकेने प्रस्तावित केला आहे. हा प्रकल्प महागडा असल्याने त्याचा फेरविचार करावा अशी विनंती शेलार यांनी केली आहे .सुरुवातीला २०० दशलक्ष लिटर पाण्याचा प्रकल्प आता ४४० दशलक्ष लिटर करण्यात येत असून त्याचा खर्च ३५०० कोटींपर्यंत होणार असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

जर हा प्रकल्प झाला तर गारगाई प्रकल्पाची गरज भासणार नाही, असेही पालिका सांगते आहे. मग गारगाई प्रकल्प रद्द करण्यात आला का? त्याचा निर्णय कुणी व कधी घेतला? असा सवाल आशिष शेलारांनी विचारला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER