मुंबई महापालिकेत तब्बल 38 हजार पद रिक्त ; आरटीआय कार्यकर्त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Anil Galgali-CM Thackeray

मुंबई :- एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत तब्बल 38 हजार रिक्त पद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यातील सर्वाधिक पदं ही क आणि ड वर्गाची आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे .

या पार्श्वभूमीवर अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी ही रिक्त पद तात्काळ भरावी, अशी मागणी केली आहे. रिक्त पदामुळे कामकाजावर परिणाम होतो आणि नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतो, असेही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच त्यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनाही पत्र लिहिले आहे

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेतील मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची माहिती आरटीआय कायद्यातंर्गत मागवली होती. मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासनाने अनिल गलगली यांना सप्टेंबर 2020 पर्यंतच्या उपलब्ध अभिलेखाची माहिती दिली आहे. यानुसार सरळसेवा आणि पदोन्नती अंतर्गत 1,10, 509 पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी 38,128 पदे ही रिक्त आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER