मंत्रालय बदली वसुलीबाबत अनिल परब यांची चौकशी व्हावी; किरीट सोमय्या यांचे राज्यपाल आणि सीबीआयला पत्र

Kirit Somiya - Bhagat Singh Koshyari - Maharastra Today
Kirit Somiya - Bhagat Singh Koshyari - Maharastra Today

मुंबई : सचिन वाझेप्रकरणात अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकारण ढवळून निघालेले आहे. “संजय राठोड गेले, अनिल देशमुख (Anil Deshmukh) गेले आता अनिल परबही जातील.” असे वक्तव्य भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले होते. मात्र, त्यांनी आता अनिल परबविरोधात (Anil Parab) राज्यपालांना पत्र लिहिले आहे.

मंत्री अनिल परब आरटीओ व परिवहन मंत्रालय बदली वसुली दर २५ लाख ते १ कोटी घोटाळ्याबाबत किरीट सोमय्या यांनी राज्यपाल आणि सीबीआयला (CBI) चौकशी साठी पत्र लिहिले आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांची परिवहन मंडळ, RTO, एसटी जाहिराती, बदल्या यासंदर्भात माहितीची पडताळणी करून योग्य ती चौकशी करण्यात यावी. असे किरीट सोमय्या यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, या नंतरचा नंबर अनिल परब यांचा असणार आहे, असे थेट वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले होते. हे वक्तव्य केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. सोमय्या यांनी परब यांचे नाव का घेतले? असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात आला. सोमय्या यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात आगामी काळात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button