‘मराठा आरक्षणासाठी हातात हात घालून काम करू’, अशोक चव्हाणांचं फडणवीसांना आवाहन

Ashok Chavan-Devendra Fadnavis

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपच्या (BJP) नेत्यांना सोबत काम करण्याचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षण (Maratha Rservation) हा राजकीय श्रेयाचा विषय नाही. हवे तर संपूर्ण श्रेय आम्ही भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना द्यायला तयार आहोत. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर भाजपनं पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून पुढे जावं. संभाजीराजे यांनी चुकीची भूमिका घेतलेली नाही. मराठा समाजाला न्याय मिळाला हीच त्यांची भूमिका आहे, हात घालून काम केले तर मराठा समाजाला निश्चितपणे न्याय मिळेल, असा विश्वासही मराठा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

पुढे चव्हाण म्हणाले, ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथील करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय स्तरावर जाण्यासाठी पुढाकार घ्यावा. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. पण केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून ईडब्ल्यूएसला ही मर्यादा ओलांडता येईल, अशी तरतूद केली आहे. या परिस्थितीत संसदेने मराठा आरक्षणासाठीही अशीच तरतूद केल्यास हा प्रश्न सोडवणे सुकर होईल. त्यामुळे विशेष अधिवेशन घेऊन संसदेत ही घटनादुरुस्ती व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.

केंद्राच्या फेरविचार याचिकेमध्ये मराठा आरक्षण या शब्दाचा साधा उल्लेखही नाही. त्यांनी आपली भूमिका केवळ १०२व्या घटनादुरुस्ती पर्यंतच मर्यादित ठेवली आहे. हा ढकलाढकलीचा विषय नाही. एक तर तूर्तास राज्याला एसईबीसी आरक्षण देण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. हे अधिकार मिळाले तरी ५० टक्क्यांच्या मर्यादेमुळे त्याचा उपयोग होणार नाही. या अनुषंगाने संभाजीराजे प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यांना भेट न देणे योग्य नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button