आजही जिंकू आणि उद्या जरी निवडणुका घेतल्यास मोदी ४०० जागा जिंकतील; चंद्रकांत पाटलांना विश्वास

मुंबई :- एकीकडे कोरोना संकटाचा सामना सर्वांना करावा लागत आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. यामुळे मराठा समाजाने संताप व्यक्त केला आहे आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) उपस्थितीत १८ मे रोजी भाजपची मराठा आरक्षणविषयक बैठक झाली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, ‘टूलकीट’ प्रकरण व राहुल गांधींसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवरून पाटील म्हणाले की, “आजही निवडणुका जिंकू, पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. उद्या निवडणुका घेतल्या तर मोदींना ४०० पेक्षा जागा मिळतील.” असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे टूलकिट?
‘टूलकिट’ हे एक डॉक्युमेंट आहे. ज्यात आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर (Social Media) समर्थन कसे मिळवावे, कोणते हॅशटॅग वापरावेत, आंदोलनावेळी जर काही अडचणी आल्या तर कुठे संपर्क करावा, असा सर्व कार्यक्रम या टूलकिटमध्ये सांगितला आहे. वर्षानुवर्षे संघर्ष करूनही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नव्हते. फडणवीस सरकारने समाजाला आरक्षण दिले. ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले. फडणवीस सरकार सत्तेवर असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही या कायद्याला स्थगिती आली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते. कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पुन्हा लॉकडाऊन लावला जात आहे. मराठा समाजाने आंदोलन करू नये, असे सरकारला वाटते. लॉकडाऊन लावून मराठा समाजाचा संताप थंड होईल, असे सत्ताधाऱ्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मोदी सरकारने शेतकऱ्यांचा  केसाने गळा कापला ; शरद पवारांच्या पत्रानंतर शिवसेनेसह सर्व पक्षांनी व्यक्त केला संताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button