धागा धागा अखंड विणू या

Let weave the thread intact -Maharashtra Today

मागच्या लेखांमध्ये सकारात्मक मानसशास्त्र बद्दल बोलताना आपण “ए स्टीच इन टाईम सेव्हन नाईन, “ही म्हण वापरली होती. प्रतिबंधात्मक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह तंत्र वापरणारी ही शाखा ! आपल्यासाठी काय योग्य आहे आणि आपण ते कसं वाढवायचं हे या शास्त्रात सांगितला आहे. (होल्डर 2012) यांनी हे विधान केले. हे कसं करायचं ? तर मग मानवाच्या अशा काही वैशिष्ट्यांचा संचाचा त्यांनी शोध लावला की जी वैशिष्ट्ये मानसिक आरोग्य आणि मानसिक आजाराची स्थिती यांच्यामध्ये एक प्रकारे बफर्स म्हणून कार्य करतील. जसे ट्रेन मध्ये दोन डब्यांच्या मध्ये अपघात झाला तरी जास्त शॉक बसू नये म्हणून योजना असते अगदी तसेच ! आणि म्हणून ही शोधलेली गुण वैशिष्ट्य लहान मुलांमध्ये यावी म्हणून आपण प्रयत्नशील राहायला हवे .उदाहरणार्थ धैर्य, आशावादी वृत्ती, अंतर वैयक्तिक नातेसंबंध, कार्यातील मूल्य ,आशा ,प्रामाणिकपणा इत्यादी.

चिंता काळजी ताण तणाव यापासून चार हात दूर राहण्यासाठी सकारात्मक मानसशास्त्र मध्ये Mindfulness चा सराव हे एक महत्त्वाचे टूल , साधन म्हणून वापरले जाते. ज्यामध्ये जीवनाची गुणवत्ता वाढीसाठी व्यक्ती प्रयत्न करतो, सकारात्मक भावभावना, जास्त समाधानी नातेसंबंध राखणे.

परंतु या Mindfulness चा सराव करणार कसा ? हे एक मेडिटेशन आहे. वर्तमान काळात राहण्याची जाणीव आणि भावना म्हणजेच तो क्षण कुठल्याही विश्लेषण याशिवाय मतप्रदर्शन किंवा करण्याशिवाय घालवणे अभिप्रेत असते. वर्तमान काळावर ,क्षणावर स्थिर राहणे. थोडक्यात, Relax to body and mind,help to reduce stress.

Mindfulness च्या सरावा मध्ये चार प्रकारच्या सरावावर भर दिला जातो.

1) फिजिकल किंवा शारीरिक : आहार-विहार आर व्यायाम झोप आणि विश्रांती.
2) मानसीक : यासाठी एका वेळी एक गोष्ट. चित्ताची एकाग्रता, सुस्पष्टता गोंधळ नसणे, महत्वाची गोष्ट किंवा प्राथमिकता.
3) भावनिक : मला कसं वाटतंय ? सकारात्मक भावना, सतत कार्यरत राहणे, सेन्स ऑफ पर्पज, जीवन काय आहे याची रुजवात.
4) अध्यात्मिक : गरजा म्हणजेच भौतिक सुख साधनांची कमी गरज.

यापैकी आज सर्वसाधारण आहार ,विहार,झोप या शारीरिक पैलूंचा आपण सुरुवातीला विचार करूया. आईच्या उदरात असताना आज आपण अतिशय अवघडलेल्या स्थितीमध्ये असतो पण नंतर जन्माच्यावेळी आपला खरा प्रवास सुरू होतो, इतर प्राण्यांपेक्षा आपल्याला बुद्धी आणि वाणी मिळालेली असल्याने मग आपण खूप वेगाने ,खूप प्रगती करत जातो. आणि मग अचानक कुठेतरी काहीतरी बिघडत.

अचानक एका दिवशी बातमी येते, की ते कोपऱ्यावरचे काका खूप सिरीयस आहे, ब्लोकेज आहेत, किंवा एखादी बातमी अशी येते की अगदी चालते-बोलते असणारे गृहस्थ अचानकच झोपेतच गेले. आणि धक्का बसतो आपल्याला. असं आपल्याबाबत घडलं तर असाही विचार येऊन जातो. आणि ते अशक्य काहीच नाही. त्याला कारण आपली बदललेली जीवनशैली म्हणजे आहार, विहार झोप यांच्यातील बदल. आणि ह्याला शहरे आणि ग्रामीण भागातही आता अपवाद ठरलेला नाही. जसे त्याला वय, व्यसन इतर घटक जबाबदार असतील .त्याचप्रमाणे सततचा ताणतणाव कंट्रोलमध्ये न राहणारे बीपी, लहानपणी लागलेली शुगरची गोळी आणि ब्लॉकेजेस म्हणजे रक्तवाहिन्या अरुंद होणे ही कारणे दिसतात.

वाढती चिंता आणि प्रदूषण याचा परिणाम म्हणून चरबी निर्माण होते आणि वाईट कोलेस्ट्रॉल निर्माण होते. आणि जेव्हा वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी गोळ्या दिल्या जातात यातून चांगले कोलेस्ट्रॉल देखील कमी होते. त्याचप्रमाणे चयापचयातील निर्माण होणारे कैल्शियम(हाडामधील नाही),जे शरीरातून बाहेर टाकले जात असते, पण पचन क्रिया बिघडल्याने ते शरीरात साठवण राहते आणि किडनी , पित्ताशयात ते साठून राहते. वाईट कोलेस्ट्रॉल निर्माण होण्यासाठी महत्त्वाचे घटक म्हणजे धातू , ते कसे जातात शरीरात? वेगवेगळ्या कंपन्यांमधून नद्यांमध्ये सोडलेल्या पाण्यातून , पेस्टिसाइड्स वापरून भाज्या, प्रदूषित हवा , म्हणजे शिसे असणाऱ्या पेट्रोल मधून, याशिवाय आपली स्वयंपाकाची भांडी, ॲल्युमिनियमच्या किंवा नॉनस्टिक कडाई. त्यातील नॉनस्टिक गेल्यानंतर उघडा पडलेल्या भाग हा ॲल्युमिनियम असतो. जो पुढे होणाऱ्या कॅन्सरला जबाबदार असतो. रेडियल टायर आपलं जी वापरतो ,त्यांची ग्रिप चांगली असते आणि त्याची रुंदी पण जास्त असते. त्यामुळे पेट्रोल जास्त वापरलं जातं आणि आपोआपच हवेतील प्रदूषण वाढतं.

आज विविध भागातून विविध पदार्थ, परिचित झालेले आहे आणि आपण खातो. त्यामध्ये अनेक प्रक्रियांचा वापर केलेला असतो .जिभेला चव चांगली लागते, त्यामुळे पोटाची हाक ऐकली जात नाही. सगळीकडच्या भिशी पार्टी म्हणजे तर सुगरणीला प्रोत्साहनच ! जास्तीत जास्त सुंदर पदार्थ करून दाखवणे आणि मैत्रिणींना आग्रहाने खाऊ घालणे , हाच उद्देश असतो. मुख्य म्हणजे दुपारी जेवणानंतर लगेच तीन ते चारच्या दरम्यान ही पार्टी असते. मग ती भुकेची वेळ असते का हो ? आदल्या दिवशीच्या रात्रीपासून दुसऱ्या दिवशीच्या बारा ते दोन वाजेपर्यंत आपण पोट रिकामा ठेवत असतो. आणि मग अचानक जेवल्यानंतर एक दीड तासांनी परत भरपूर खातो. हे त्या पोटावर अत्याचार असतात. अजिनोमोटो, सोया सॉस ,चिली सॉस, भरपूर प्रिझर्वेटिव्ह असणारे पदार्थ, तळलेले पदार्थ, स्वीटस् यांची रेलचेल असते. पुन्हा सण समारंभ, लग्नकार्य. हे सगळ सुरूच असते.

काही वर्ष मागे जाऊन बघितलं तर गहू खाण जवळ जवळ नव्हतं. 1960 मध्ये हरितक्रांती झाली. पंजाब मध्ये गव्हाचे चांगले उत्पन्न झाले. पण महाराष्ट्र मध्ये फक्त सणावाराला , पुरणपोळी करण्यासाठी किंवा उपवास सोडण्यासाठी फक्त गहू वापरल्या जात असे. आणि तोही खपली गहू काळा वापरला जाई. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असायचं. आपल्याकडची धान्य म्हणजे ज्वारी, बाजरी ,नाचणी ही होती. त्यांचं पुढचं अत्यंत सोपं होतं. गव्हामध्ये असलेला ग्लूलेटीन हा पचनाला कठीण असतो. तांदूळ सुद्धा पॉलिश केलेलाच आपणास काय खातो. रेशनचा तांदूळ म्हणजे नाक मुरडतो. किंवा अगदी भाकरी ठेचा वगैरे म्हणजे गरिबाचे खाणे अशी समजूत असते, आम्हाला परवडते,आम्ही नाही तसं खात, असा एक समज असतो तो. खरेतर भाकरी ,ठेचा,कांदा, ठेच्यावर कच्चे शेंगदाणे तेल ,पिठलं हा पूर्णाहार आहे.

साखर हा तर अत्यंत वाईट प्रकार आहे. त्यापासून सुटका करून घेतली तर खूपच उत्तम. कारण आपल्याला चहा कमी गोड वगैरे असून भागत नाही. नाहीतर प्यायचा कशाला ? तल्लफ भागत नाही असा चहा प्रेमींना वाटत असतं. पण मग त्या ऐवजी चहाच सोडलेला बरा !

एवढं जरी पाहिलं तरी आपलं वजनही आटोक्यात ठेवायला मदत होते. कारण वाढते वजन हे अनेक आजारांचं निमित्त असतं. भाज्या देखील वांगी ,बटाटे, किंवा हरभरे वाटाणे हे प्रोटीन म्हणून चांगले आहेत. परंतु पचनाला कठीण आहे आहेत आणि पोट साफ झाले नाही तर वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर पडणार नाही. पालेभाज्यांचा ही आहारात समावेश हवाच हवा. मुख्य म्हणजे त्याचा पण टाकून शिजवा, आणि खायला जमत असतील तर अर्ध्याकच्च्या फ्राय करा. फळांमध्ये देखील क जीवनसत्व देणारी फळे संत्री मोसंबी पेरू आवळा आणि लिंबू हे दररोज वापरात असावी.

रोज एक बदाम, अक्रोड, सुके अंजीर, काळ्या मनुका, मी जाऊन खाल्ल्या तर फारच छान !

प्रोटीन साठी उसळी ,घट्ट वरण, आणि दुग्ध जन्य पदार्थ परंतु आज-काल गाई-म्हशींना सुद्धा जास्त दुधासाठी इंजेक्शन्स दिलेली असतात. कुठलीही तेल धूर निघेपर्यंत तापायला नको. म्हणजे फोडणी ला तेल टाकल्यावर, कांदा चटणी किंवा लसूण सोलणे. यापेक्षा आधी पूर्वतयारी करून मगच फोडणी साठी गॅस ऑन करावा. कारण त्यामधून निर्माण होतात.

फक्त आहारानेच सगळं काही साधते असं नाही. व्यायामाला आपली पॅशन बनवायला पाहिजे. तो आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनायला हवा. कुठेही गेले तरी पायी फिरायला जाणे, टेकडी चढणे किल्ला चढणे. घरातील कामे वाकून मुद्दाम करणे, खाली वाकून बाथरूम धुणे, बागकाम आपण एक छान व्यायाम आहे. वेगवेगळ्या यूट्यूब चैनल वर व्यायामाचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत, आपल्याला जमतील त्याप्रमाणे आपल्यासाठी त्याचे पॅकेज तयार करा .आणि मग ठरवल्याप्रमाणे दररोज कमीत कमी तीन महिने तो व्यायाम केल्यावर भरपूर फरक जाणवतो. सुरुवातीला फरक तर अगदी तीन-चार दिवसात जाणवतो. आपल्या हालचालींमध्ये आपल्या उत्साहा मध्ये हा फरक दिसून येतो.

मानसिक ताण तणाव नियोजन करण्यासाठी तो तणाव ओळखणे आणि स्वीकारणे. हे सगळ्यात महत्त्वाचे आहे ,बरेच लोक मला ताण आहे की गोष्ट नाकारत असतात. आणि बॅक ऑफ द माइंड तो असतो. तो आहे असंच हे स्वीकारल्या त्यानंतर जास्तीत जास्त तो ताण दूर करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, त्याला फेस करणे हे आवश्यक असतं ते. परंतु सगळ्यात शेवटी काही शक्य नसेल तर सरळ तो प्रश्न neglect करावा ,त्याकडे दुर्लक्ष करावे. कारण सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही आहात आणि तुमची तब्येत ! ती जर व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी आहेत.

आणि सगळ्यात महत्त्वाची ती झोप ! सद्यस्थितीमध्ये सगळ्या सोशल मीडियाने आपल्या या झोपेवर आक्रमण केलेला आहे, मुलं विद्यार्थी हे तर अगदी झोपतानही , चादर अंगावर घेऊन मोबाईल बघणे चालूच असते. त्यातून निघणाऱ्या किरणांचा आपल्या सगळ्या शरीरावर अतिशय वाईट परिणाम होत असतो आता सिद्ध झाल आहे. त्यामुळे झोपायच्या एक-दीड तास पूर्वी या साधनांपासून पासून दूर जायला पाहिजे. शक्यतो वरती डोक्याशी झोपताना ठेवायला नको दुसऱ्या खोलीत ठेवणे शक्य असेल तर फार छान. अगदीच कुणाला अर्जंट कॉल येणार असतील म्हणजे डॉक्टर किंवा असे व्यावसायिक. तरच जवळ ठेऊ शकता. रात्री आपल्या मेंदू मधून मेलॅटोनीन नावाचे रसायन स्त्रवत असते.

आपल्या या मानसिक शांततेसाठी खूप पूरक आहे. अंधारामध्ये त्याचे सिक्रेशन होते. त्यामुळे शक्यतोवर अंधार करून झोपलेल् केव्हाही चांगलं. झोपण्यापूर्वी जेवणही दोन तास पूर्वी झालेलं असेल तर झोपताना अस्वस्थता येत नाही. झोप न येणे ही आजकाल फार कॉमन तक्रार आहे. पुस्तक वाचन हा त्यावरचा उत्तम उपाय आहे. पुस्तक वाचत वाचत लागलेली झोप ही केव्हाही छान! आपण काल उल्लेख केल्या प्रमाणे जर दिवसभरात झालेल्या चांगल्या कामाची आठवण, आणि त्याला कारणीभूत झालेल्या गोष्टीं बद्दल कृतज्ञता व्यक्त केली, थोडे नामस्मरण करू शकलात तर छानच. सकारात्मक मानसशास्त्रातील असे काही ,मानसिक आरोग्य निर्माण करणारे धागे जोडूनच, सुरेख निरामय जीवनाचे एक उत्तम भरजरी वस्त्र, निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत राहू या.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button