शिक्षक भरती अनुषेशसाठी प्रयत्न करु : शिक्षणमंत्री गायकवाड

Varsha Gaikwad

मुंबई : मागासवर्गीय सरळसेवा भरती आणि पदोन्नती आरक्षणासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिले. कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने याबाबत ना. गायकवाड यांना भेटून निवेदन दिले.

ग्रामविकास विभाग आणि खासगी शिक्षणसंस्थांकडून बिंदूनियमावली मागवली आहे. अनुषेश भरतीनंतर सुमारे सहा हजार शिक्षकांची भरती केली जाईल. सेवा ज्येष्ठता डावलून पदोन्नती दिलेले तसेच अनियमित कामे केलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीची प्राधान्याने चौकशी केली जाणार असल्याचे यावेळी ना. गायकवाड यांनी शिष्टमंडळाला सांगितले. पेन्शन केसेस मधील दिरंगाई थांबवा, २५० उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदोन्नतीने पदे भरा, शासन सेवाशर्थी १९८१ मधील जुन्या कालबाह्य बाबी बदला, खासगी संस्थेत मागासवर्गीय शिक्षकांबाबत धोरणात बदल करा, अनुकंपा भरती करा, एमसीआयटी परीक्षेसाठी मुदत वाढ द्या, आदी मागण्यांचे निवेदन संघटनेने यावेळी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER